पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



    चार चरित्रात्मक लेख.

त्यामुळे त्यांचे बुद्धीला पूर्ण पक्कता आली होती, व त्यांतून जात्याच ती विशाल

व ग्राहक असल्यामुळे इंग्रेजी अभ्यास शास्त्रीबोवांस विशेष जाचला नाही. त्यांनी

तो अभ्यास करतेवेळीं अर्थशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, अशा अनेक शास्त्रां-

वरील ग्रंथांचें अध्ययन व पर्यालोचन केलें. या शास्त्रांचे परिशीलन करतेवेळी

ज्या शंका त्यांस येत असत, त्यांपैकी पुष्कळांचें समाधान त्यांचे गुरूंचे हातून

होत नसे असे सांगतात. पुढे सर अलेग्झांडर ग्रांट वगैरे मंडळींना देखील त्या

शंकांचे समाधान करतां येईना असें ऐकतों. अशा जाड्या जाड्या विद्वानांना जेव्हां

शास्त्रीबोवांच्या शंका दूर करवतना, तेव्हां त्या शंकांची योग्यता किती होती

याचे अनुमान करणे कठिण नाहीं. ज्या बुद्धीचे अंगीं अशा शंका काढण्याची

शक्ति होती, की ज्यांचे समर्पक समाधान करणें नांवाजलेल्या विद्वानांस जड जाई

व प्रसंगवशात् होतही नसे, त्या बुद्धीची थोरवी लोकोत्तर होती यांत तिलप्रायही

संदेह नाहीं. असली वेंड हीं विश्वसृष्टीतील अद्भुत कोटींतच गणिली पाहिजेत.

 विद्याभ्यास संपल्यावर त्यांस विद्याखात्यांत सरकारी नोकरी मिळाली. अखेर

पर्यंत ते त्याच खात्यांत होते. त्यांत जे निरनिराळे हुद्दे मिळाले त्या सर्वात

त्यांनीं यश मिळविले. त्यांचा मनोदय असा होता की पुण्याचे बाहेर ह्मणून

नोकरीकरितां जावयाचें नाहीं. तोही त्यांचा मनोदय अव्याहत शेवटास गेला.

त्यांचेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदा सुप्रसन्नता असे. पुणे कालेजांत प्रोफेसर

असतां व ट्रेनिंग कालेजांत प्रिन्सिपाल असतां शास्त्रीबोवांकडे पढविण्याचे काम

असे. त्यांची शिकविण्याची शैली फारच नामी होती अशी त्यांचे त्या वेळचे

शिष्य अद्यापि स्तुति गातात.

 शास्त्रीबोवा चांगल्या प्रतीचे वक्ते असत. त्यांचे कंठांत माधुर्य अगदीं नसे,

त्याला त्यांचा इलाज नव्हता. या त्यांचे कर्कश स्वराबद्दल त्यांचे सहाध्यायी

त्यांची थट्टा करीत असत. पाठशाळेतील त्या वेळच्या विद्यार्थ्यांनी आपले गुरु-

उपगुरु, सहाध्यायी यांजवर फावल्या वेळीं कांहीं पधें केली होती. त्यांतील कांहीं

अद्याप केव्हां केव्हां ऐकण्यांत येतात. कृष्णशास्त्रीही एका पद्याचे विषय झाले

आहेत. त्यांत त्या पद्यकारानें शास्त्रीबोवांचे स्वरूपवर्णन करून शेवटी 'काकवत्

कर्करायते' असें त्यांचें स्वरवर्णन केले आहे. असा जरी स्वर होता तथापि वाद-

विवादांत त्यांचा असा हातखंडा असे की जो पक्ष ते उचलीत, त्याचे हेतूदाहर-