पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कृष्णशास्त्री चिपळूणकर.  

____________________________________________________________________

सखल आहेत असें पुरतेपणें माहित असतां व त्यांखालून शेकडो वेळां जाण्याये-

ण्याचा प्रसंग असतां कित्येक वेळां डोकी तडातड आपटल्याचा व डेंगळे आल्या-

चा प्रत्यय पुष्कळांस असेल. तर वेळेवर दारें सखल असल्याचें अवधान राहत

नाहीं असा साधारण अनुभव आहे. तेव्हां थत्ते यांनीं साठे यांचें मन अनेक

विषयांत मुद्दाम गुंतविलें असतां शिंके डोकीवर असल्याचें त्यांचे लक्षांत राहिलें,

यावरून त्यांची धारणा वर्णनीय होती असे ह्मणण्यास कांही प्रत्यवाय दिसत

नाही. साठे यांच्या बुद्धि व धारणा यांविषयीं दुसरी अशी एक गोष्ट ऐकिवांत

आहे की, साठे हे नैयायिक होते. त्यांचा व्याकरणाविषयीं व्यासंग नसल्या कार-

णाने त्यांस त्या विषयांत वैयाकरण हात घालं देत नसत. एका वादप्रसंगांत तर

वैयाकरणांनी साठे यांची थोडीसी मानखंडना केली. त्यावरून मोरशास्त्री यांनीं

तीन महिन्यांत व्याकरणशास्त्राचें अध्ययन करून ते बाद खेळण्यास तयार झाले.

त्यानंतर व्याकरणांतही पूर्वपक्ष उत्तरपक्ष करण्यास त्यांस मनाई नसे. आतां ज्या

शास्त्राचे अध्ययनार्थ कांहीं वर्षे तरी गुरुगृहीं खपावें लागतें तें दोन चार महिन्यां-

त तयार करण्याचें ज्यांचे सामर्थ्य, त्यांचे बुद्धीची विशालता व ग्राहकता किती

ह्मणून वर्णावी! असे जे मोरशास्त्री साठे त्यांचे शिष्य हे कृष्णशास्त्री होते. शि-

ष्याची ची बुद्धि गुरूचे बुद्धीहूनही विशाल आहे असे मोरशास्त्री यांचे प्रत्ययास

आलें. तो प्रकार असाः- एकदा मोरशास्त्री यांचे आग्रहावरून कृष्णशास्त्री यांनी

गुरूंचे बरौवर वाद करण्याकरितां प्रतिपक्ष स्वीकारला व त्या वेळेस चमत्कार

असा झाला की शिष्यापुढे गुरुजींचा कोटिक्रम चालेना. त्यावेळेस शिष्याची बुद्धि

पाहून साठे यांस परमानंद झाला, व लागलीच त्यांनी आपल्या अंगावरची शाल-

जोडी काढून शिष्याचे आंगावर घातली. ठीकच आहे. सद्गुरूंची अशीच रीति

आहे. " इच्छेत्सर्वत्र विजयं शिष्यादिच्छेत्पराजयम्. " त्या दिवसापासून मोर-

शास्त्री आपले सच्छिष्यास ' बृहस्पति ' या नांवाने हाक मारूं लागले, व पाठ-

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनीही त्याच नांवानें कृष्णशास्त्री यांस ह्मणावें अशी वट

ताकीद त्यांनीं फिरविली. मोरशाख्यासारख्या गाढ्या विद्वानानें ' बृहस्पति ' अस

किताब द्यावा, तेव्हां तो पास मिळाला त्याची योग्यता किती असावी हें सांगणें

नको. या गुरुशिष्यांचें जोडपेंच लोकोत्तर यांत शंका नाहीं.

 पुढें विश्रामबागेत इंग्रेजी भाषा वगैरे पढविण्याचा उपक्रम चालू झाला. तेव्हां

कृष्णशास्त्री यांनीं तो अभ्यास सुरू केला. इकडे पूर्वी शास्त्राध्ययन झाले होतें,