पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



   चार चरित्रात्मक लेख.
___________________________________________________________

पुनरावृत्ति चालली असावी. यांची बुद्धि इतकी तीव्र व पक्क असे कीं, पाठाचे

वेळीं त्यांनी सहाध्यायांच्या पुष्कळ शंका निवारण कराव्या, परंतु यांच्या शंका.

मात्र त्यांस निवारितां येऊं नयेत. केव्हां केव्हां अध्यापकांसही त्या शंका जाचत,

असे सांगतात. आतां अध्यापक तरी कांहीं कच्या गुरूचे चेले होते असें नाहीं.

त्यांची बुद्धिही फार विशाल व व्यापक होती असे शास्त्रमिंडळास मान्य आहे.


 मोरशास्त्री साठे यांचे बुद्धीची ख्याति आजवर गाजत आहे. यांजविषयीं

अनेक आख्यायिका आज जुन्या शास्त्रीलोकांचे तोंडून ऐकू येतात. मोरशास्त्री

हे प्रथमत: कोंकणांतून विद्याभ्यासाकरितां पुण्यास आले. व तेथें आल्यानंतर

त्यावेळचे विद्वद्रत्नशिखामणि नीलकंठशास्त्री थत्ते यांजकडे भेटीस गेले, व

अनुग्रह केल्यास आपल्याजवळ अध्ययन करण्याची इच्छा आहे अशा आशयाची

त्यांजवळ त्यांनी विनंती केली. मोरशाख्यांचे तोंडावरूनच नीलकंठशास्त्री यांस असें

वाटले की, ह्यांस अध्यापन केले असतां शिष्य नांव राखण्याजोगा आहे. यावरून

शास्त्रीबोवांनी साठे यांस पढविण्याचें कबूल केले. नंतर साठे यांची धारणा

कितपत आहे याची परीक्षा करण्याकरितां थत्ते शास्त्री यांणी या नवीन शिष्यास

घरी जेवणास बोलाविलें. भोजनास बसण्याचे जागीं एक शिंके टांगलेलें होतें.

त्याचे खालीं जें पान आलें तें साठे यांजकरितां ठेविलें, व वाकींच्यावर इतर

मंडळी बसली. साठे पानावर बसते वेळीं नीलकंठशास्त्री यांनी वर शिंकें

असल्याचें सुचविलें. पुढे जेवणास आरंभ झाला. दोन घटका सुमारें

जेवण चाललें होतें. भोजनसमयीं अनेक प्रकारचे विषय निघून

गोष्टी चालल्या होत्या. साठे यांस डोईवर शिर्के आहे याची विस्मृति

पडावी ह्मणून थत्ते यांनी त्यांस पुष्कळसें बोलायास लाविलें; व साठे हेही कांहीं

दुर्मुख नव्हते; तेव्हां त्यांनीही पुष्कळच बोलण्याचा सपाटा चालविला. पुढे

भोजन आटपलें. सर्वांनी आपोशन घेतल्यावर जो तो आंचवायास उठू लागला..

साठे हे उंच पुरुष होते, व डोक्यावर शिंकें होते हैं लक्षांत होतें, ह्मणून उठतांना

ते वांकूनच उठले. हे पाहून थत्ते यांनीं साठे यांची जी परीक्षा करण्याची होती ती

केली. आतां या गोष्टींत कांहीं विशेष आहे असे कित्येकांस वाटणार नाहीं, हैं

खरें. परंतु आह्मांस तर ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते. या गोष्टीवरून साठे यांचे

धारणाशक्तीची स्थालीपुलाकन्यायानें चांगली अटकळ करितां येते. घराचीं दारें