पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  कृष्णशास्त्री चिपळूणकर.  

बोबांचे चरित्राची हेळसांड होणार नाहीं असें आह्मी मनापासून इच्छितों. शास्त्री-

बोवांचे चरित्रापासून शिकण्याजोग्या गोष्टी पुष्कळ आहेत असे आह्मांस जी

आज थोडीशी त्यांची माहिती आहे तिजवरून वाटतें.


 कृष्णशास्त्री हे पुणे मुक्कामी आमचे शेवटचे बाजीराव ब्रह्मावर्ती प्रतिष्ठित

झाल्यावर थोड्याच काळाने ह्मणजे सुमारें १८२४ सांत जन्मले. यांचे वडील

गरीब स्थितींत होते. हे दरमहा चार रुपयांवर कारकुनीचे नोकरीवर होते.

ज्याप्रमाणे विद्या शिकण्याची साधनें आज इंग्रज सरकारानें जिकडे तिकडे

लहानापासून थोरांपर्यंत हवीं त्याला सुलभ करून ठेविलीं आहेत, तशीं ज्या वेळी

शावांचे शिकण्याचे दिवस होते त्या वेळी नव्हतीं; कारण इंग्रज सरकारचा

अंमल त्या वेळेस सर्वत्र वसला नसून नुकता बंदोबस्त सुरू होता. विद्या कला

इत्यादिकांना उत्तेजन देणें हें इतर सर्व बंदोबस्त झाल्यावर सुचतें. त्याप्रमाणे

पुणें प्रांत नवीनच इंग्रज सरकाराचे हातीं गेला असल्यामुळे, तेथे शिक्षणाच्या

सोयी अझून व्हावयाच्या होत्या. शास्त्रीबोवांना प्रथमत: गांवठी शाळेत घातलें. तेथें

थोडासा अभ्यास झाल्यावर शास्त्रीबोवांच्या वेदाध्ययनास आरंभ झाला. परंतु

या उरस्फोडी अध्ययनांत शास्त्रीबोवांनी फार दिवस घालविले नाहींत. पुणे येथें

विश्रामबागेत संस्कृत पाठशाला असे. तेथें षट्शास्त्रांचा पाठ चालत असे.

विद्यार्थ्यांना पाठशाळेत येण्यास उत्तेजन यावें ह्मणून त्यांस सरकारांतून थोडे

बहुत वेतन मिळत असे. या ठिकाणीं शास्त्रीबोवांनीं तीन शास्त्रांचें अध्ययन केले.

असें सांगतात कीं, शास्त्रीबोवांचे सहाध्यायी पुष्कळ विद्यार्थी होते, त्या सर्वांवर

चिपळूणकरांची छाप असे. ही गोष्ट त्यांचे जे थोडे सहाध्यायी जिवंत आहेत,

तेही कबूल करितात. बरें त्या मानानें कृष्णशास्त्री यांचा पाठांसंबंधानें दृढ व्यासं-

गही नसे. बहुतेक सर्व विद्यार्थ्यांचें उठणे बसणें निजणें विश्रामबागेतच असे,

तेव्हां शास्त्रीबोवा कितपत नेटानें अभ्यास करीत हैं त्यांच्या सोबत्यांस माहीत

असे. शास्त्रीबोवांचा बहुतेक वेळ खेळण्यांत व थट्टा मस्करी करण्यांत जात असे,

परंतु पाठ ह्मणून दाखवितांना ज्यांनीं पाठावर पूर्ण झोड लावली असे, अशा

सर्वोपेक्षां शास्त्रीबोवांचा पाठ सरस ठरे. जो पाठ शास्त्रीबोवांनी घ्यावा त्यांत

त्यांचा असा कांही अभिनिवेश होत असे की, कोणी परक्यानें तो प्रसंग पाहिला

असतां त्याला असे वाटावें कीं, यांचा एकवार सर्व अभ्यास होऊन ही

,