पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चार चरित्रात्मक लेख. D% 3D - - AAT - कृष्णशास्त्री चिपळूणकर. शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे । साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ॥ या विश्वसनींतील सर्व घडामोडी काही नियत नियमानुरोधाने चालत आहेत. आज जे नियम दृष्टीस पडतात तेच हजारों वर्षांपासून चालत आले आहेत. बहतेक पदार्थ कोणत्या ना कोणत्या तरी नियमास वश आहेत. तथापि असे काही पदार्थ परमेश्वर केव्हां केव्हां उत्पन्न करितो की त्यांस कोणताही नियम लागू पडत नाही. त्यांचे नियम स्वतःसिद्धच आहेत असे मानल्यावांचून गत्यंतर नसते. बहुतेक सर्व धर्मात अनेक चमत्कार तत्तद्धर्मसंस्थापकांनी आपल्या अदत शक्तीची प्रचीति लोकांस यावी ह्मणून करून दाखविल्याचे उल्लेख