पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चार चरित्रात्मक लेख.





आहेत. हे जर सर्व खरे आहेत असे मानणें असेल तर हे ईश्वराचे अगाध

शक्तीचे निदर्शक होत असें कबूल केल्यावांचून दुसरी तोड नाही. अशा प्रकारचे

चमत्कार या सृष्टीतील बहुतेक सर्व कोट्यांत व त्यांचे पोटभेदांत दिसून येतात.

 मनुष्यजाति हे त्यांतलेच एक कोडे आहे. या मनुष्यजातीचेही उत्पत्ति,

स्थिति व लय या संबंधाने काही नियम आहेत, व बहुतेक मनुष्यांची गति

या नियमानुरोधानेच होत असते हे निर्विवाद आहे. मनुष्याचे उत्पत्तीस स्त्री-

पुरुषसंयोग हे कारण सर्वमान्य आहे. परंतु ख्रिस्तीधर्मप्रवर्तक येशूच्या जन्मास

हे सर्वसामान्य कारण नाही असें 'पवित्रशास्त्र' सांगते. मनुष्यास लयकाली जडदे

हत्याग करणे आवश्यक आहे हे जरी अनुभवसिद्ध आहे, तरी तुकाराम देहासुद्धा

परधामास गेला असें लौकिक वार्तेवरून व " की सतनु मुक्त झाला योगाची

सिद्धि हे तुकारामी" ह्या व अशासारख्या इतर लेखांवरून सर्व संतमंडळ

मानते. मनुष्याची साधारण उंची ह्मटली ह्मणजे ६ फुटीपर्यंत फार झाली. ती

देशमानाप्रमाणे कमी जास्ती आहे. परंतु ज्या देशांतील लोकांची चळण

साधारणत: ठेंगणी अशा ठिकाणी ७-८ फुट उंच पुरुष ह्मटला ह्मणजे

चमत्कारच ह्मटला पाहिजे. परवां पारिस येथे चालू असलेल्या प्रदर्शनाकरितां

चीन देशांतून अशाच प्रकारचा एक उंच पुरुष गेल्याचे वर्तमानपत्रांतून दृष्टीस

पडत आहे. असे ईश्वराचे अद्भुत खेळ केव्हां केव्हां नजरेस येतात. अशाच

प्रकारचे चमत्कार मनुष्याचे बुद्धिवैभवासंबंधानेही दृष्टिगोचर होतात. मनुष्याचे

बुद्धीविषयी जबर मतभेद दृष्टीस पडतो. कोणी असें ह्मणतात की, सर्व मनु

ष्यांस परमेश्वराने उपजत एकसारखी बुद्धि दिलेली असते. ती कमी किंवा

जास्ती कोणासही नसते. व्यवहारांत पाहतां निरनिराळे मनुष्यांच्या बुद्धि

निरनिराळ्या प्रकारच्या दृष्टीस पडतात, व एकाच प्रकारचे बुद्धीतही शक्तिभेद

आढळतो. तर याजवर त्यांचे समाधान असें आहे की, शिक्षण व साहचर्य

यांवर बुद्धिशक्तिभेद अवलंबून आहे. मूलतः बुद्धीत भेदभाव नाही.

 आतां कित्येकांचें असें ह्मणणे आहे की, ज्याप्रमाणे आईबापांचे प्रकृतिधर्मानुरूप

पुढे त्यांचे मुलांचे प्रकृतींवर परिणाम घडतात, त्याचप्रमाणे आईबापांचे बुद्धिप्रमाणानें

मुलांचे बुद्धीवर भिन्न भिन्न परिणाम दृष्टीस पडतात. उदाहरणार्थ-एका मुलाचे आईबाप

अशिक्षित आहेत, व दुसऱ्याचे शिक्षित व पक्व बुद्धीचे आहेत. तर सहजवृत्त्याच त्या