पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
चांदण्यांतील गप्पा

नाहीं ? तशीच मीही पडेन. माझ्या अन्नदात्रीचे जें होईल तेंच माझेही होईल." हैं त्या दासीचे निग्रहाचे बोलणे ऐकून तिने तिला आपल्याबरोबर येण्यास रुकार दिला, व तिचा झालेला निश्चय हरूपसिंहाला कळविण्यास तिने तिला पाठविलें. स्वरूपसिंहालाही ती गोष्ट मानवली.

 रात्रौं निघावयाचें म्हणून त्यानें कोणाला कळविले नव्हते; परंतु त्याने आपली तयारी चालविली होती. त्यानें हल्लींचे चाकरनोकर व जुने नोकर यांना बक्षिसे वांटली. त्यांनी कशाबद्दल बक्षिसे म्हणून विचारिले तर 'युवराजांच्या वाढदिवसानिमित्त म्हणून तो सांगे. अशामुळे त्या लोकांना कांहींच संशय आला नाहीं. इकडे लावण्यवतीनेही आपली तयारी केली. तिनें त्या आपल्या विश्वासू दासीकडून मंदील, चोळणा, झगा, वगैरे विकत आणविले व आपल्या- जवळचे सर्व जवाहीर, सोनें, मोतीं, वगैरे मोठ्या बंदोबस्तानें बांधून घेतले. तिनेही आपलीं नेसावयाची उंचीं लुगडीं, पैठण्या, शालु, हे सर्व आपल्या जुन्या दासींना वांटून टाकिलें, व रात्रीच्या निघण्याच्या वेळेची वाट पाहात वसली. आपली सुटका होणार या आनंदाने तिचें पोट भरून आल्यामुळे तिला तहानभूकसुद्धा लागली नाहीं. तीन तीनदा खिडकीशीं जाऊन ती दार उघडून पाही; पुन्हा आंत येई, व सचिंत आपल्या पलंगावर पडे. पडल्यापडल्या जे विचार तिच्या मनांत येत ते अशासारखे असतः -

 "मी व स्वरूपसिंह अशीं राजधानीच्या बाहेर पडतों आहों; परंतु आम्हांवर कोणता प्रसंग येईल कोण जाणे. आपण पळून गेलों हे आपले भाऊ व आई यांना पसंत पडले नाही, तर ती आपणांस धरून आणून खरोखर वंदीत घाल- तील व आता हा महालांतल्या महालांत बंदिवास आहे, तो खरोखर पुढे तुरुं- गवास होईल; आणि काय काय हाल होतील कोण जाणे. भावांनी पाठलाग नाह केला तर कदाचित् चोराचिलटांच्या हाती किंवा हिंस्र पशूंच्या जबड्यांत पहावें लागेल. ह्या कोणत्याही संकटानें गांठलें नाहीं तर रानावनांत उपाशीं मरण्याची पाळी येईल. भयाण अरण्यांत वाटा ठाऊक नसल्यामुळे कोणत्या संकटांत पडावें लागेल आणि कोणत्या नाहीं कोण जाणे !” यासारखेच आणखी काहीं विचार केल्यानंतर ती थोडी आनंदित होऊन आपल्याशींच म्हणाली:-" इतकीं जरी संकटे आली तरी त्यांत एक सुखाची गोष्ट आहे, आणि तें सुख म्हणजे