पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

८१

कठिण आहे. त्याची कल्पना वाचकांनींच करावी हेच चांगले. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. कांहीं वेळ नुसते एकमेकांकडे पाहाण्यांतच त्यांना सुख वाटले. परंतु ते सुख फार वेळ टीकणारें नाहीं याचे भान होऊन दोघेही कष्टी झाली. कर्मधर्मसंयोगानें त्या वेळी राणीच्या तर्फेचें एकही माणूस त्या ठिकाणी नव्हते. जी माणसें होतीं तीं लावण्यवती व स्वरूपसिंह यांना अनकूल अशींच होतीं. स्वरूपसिंहाच्या हुजन्याने त्यांस सुचविलें कीं, “तुम्हीं वर अथवा बार्गेत जाऊन बाईसाहेबांची गांठ घेऊन यावें. मी कोणी येईल तर त्याच्या पाळतीवर राहतो. " स्वरूपसिंहास ते इष्टच होतें. त्याने लावण्यवतीला वार्गेत येण्याची खूण केली व ती दोघेही बागेत गेलीं. तेथे त्यांच्या सर्व सुख- दुःखाच्या गोष्टी झाल्यावर स्वरूपसिंह लावण्यवतीस म्हणाला:- “ या अशा जाचापासून आपली सुटका होईल, आपण पूर्ववत् सुखाचे दिवस पाहू, असे मला तर कांहीं चिन्ह दिसत नाही. यासाठी आपण आपली आजची साधून हे राज्य सोडून जिकडे वाट फुटेल व नशीव नेईल तिकडे जाऊं. तूं वेषांतर कर व मीही वेषांतर करितों; आणि आज रात्री बाराच्या सुमारास लोक दारूकाम वगैरे बघण्याच्या गर्दीत असतील, अशा वेळीं येथून नशिबाला वाटाड्या करून चालतीं होऊं, तूं आपले जवळ घेववेल तेवढें जवाहिर घे व मीही मजजवळ असलेले घेईन. आपण दोघे दोन उमदे घोडे घेऊन चालतीं होऊं. आज गडबडीचा दिवस आहे, फारशी चौकशी होणार नाहीं. " स्वरूपसिंहानें दाखविलेला हा मार्ग लावण्यवतीला बरासा वाटला, आणि तिने त्याला अनुमोदन दिले. नंतर त्यांच्या एकमेकांच्या हांका मारण्याच्या वगैरे खुणा ठरून स्वरूपसिंह आपल्या वाडयांत गेला व लावण्यवती माडीवर गेली. तिला आतो आपली तुरुंगांतून सुटका होणार म्हणून भारी आनंद झाला. आज तिची एक विश्वासू दासी राणी वाड्यात नाहीं अशी संधि पाहून तिला भेटण्यास आली होती, तिला तिर्ने हॅ वृत्त सांगितले. तेव्हा तिलाही फार आनंद झाला. आणि आपणास बरोबर घेऊन जाण्याबद्दल तिने तिला आग्रहानें विनविलें तो म्हणाली:- " मीही तुझ्याबरोबर येतें. माझ्या दोन हातानी जी चाकरी होईल ती मी करीन आणि तुजसवें मी आपले आयुष्य घालवीन. मला तरी येथे राहून काय करावयाचे आहे ? तूं तरी नशिबावर हवाला ठेवूनच बाहेर पडणार की