पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

८३

स्वरूपसिंहाच्या सान्निध्यापासून होणारें सुख होय." ती म्हणाली :- "उपाशी मर- ण्याचा, वाघाच्या जवडयांत पडण्याचा, चोरांच्या तडाक्यांत सांपडण्याचा, पाय घसरून कड्यावरून पडण्याचा, नदीच्या गेहांत वुढण्याचा कोणताही व कसलाही प्रसंग आला तरी आम्हां दोघांवर एकदम येईल. कोणत्याही दुःखाचे वांटेकरी आम्ही दोघेही होऊं. मरणही आलें तरी आम्ही दोघांना एकदम येईल. या सुखापेक्षा आणखी दुसरें सुख ते काय असणार ? या असल्या सुखाला- महाल-रूपी तुरुंगांत राहाण्याच्या सुखाला - मां ही अश्शी लाथेनें झुगारून देईन.” अशा विचारांत निमग्न असतां तिनें ती खुणेची शीळ ऐकली. त्याबरोबर ती खडबडून उठली. घाईघाईनें, उत्तर देण्याची ठरलेली खूण, तिनेंही केली. तिची दासी तिच्या महालांतच होती. तिनं त्र दिनें मर्दानी पोपास चढविला. पहिला पोषाख तेथेंच दांतओठ चावून रागानें फेंकून दिला. एवढेच नव्हे, तर तो पायाने तुडवून चुरगाळून चुरगाळून फेकून दिला, आणि दासीला म्हणाली: " या असल्या जनानी पोषाखामुळेच मला हा बंदीवास घडला, नाहीं ग?" इतकें बोलून ती आपल्या तयारीस लागली. डोक्याला मंदील बांधला, कमरेला शेला कसला, व तलवार लटकावून ती शिपाईवहाद्दर बनली. तिची दासीही त्याचप्रमाणे पुरुषवेष घेऊन त्या दोघीही जिना उतरून मागील बागेच्या दारांत आल्या. तेथें त्यांचेकरितां घोडे घेऊन स्वरूपसिंह उभा होताच. त्या दोघी व तो घोड्या- वर बसून तडक राजरस्त्यानेंच. पण जलद नगरावाहेर पडली.

 मध्यरात्रीचा समय. जिकडे तिकडे सामसूम झाले होते. रात्रीं हिंडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांचा आवाज, कोल्ह्याकुत्र्यांचें ओरडणे, याशिवाय कोठें सरपटणारे प्राणी, वाळलेल्या पायांत सरपटल्यामुळे होणारी खजबज, व रात्रीच्या किंड्यांचे कर्कश शब्द जिकडे तिकडे ऐकूं येत होते. अशा समयीं तीन घोडेस्वार किरी झाडींतन चालले होते. ते एकमेकांशी कांहीं एक भाषण न करितां कोणीकडून तरी वाट संपविण्याच्या विचारांत असावे असे वाटलें. कारण, प्रत्येक जण पूर्वेच्या बाजूला वरचेवर वळून पाहात होता. ते अगदर्दी निर्जन अरण्यांतून व आडवाटेने चालले असल्यामुळे, कोठें थोडीशी खजवज झाली तरी त्यांच्या पोटांत भीति उत्पन्न होऊन ते कावरेबावरे होऊन मागे वळून पाहात व सुस्कारा टाकीत. त्यांत जो तरुणसा घोडेस्वार होता तो फारच दचकल्यासारखा वाटे;