पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
चांदण्यांतील गप्पा

परंतु तो तिला कठोर शिलातलाप्रमाणे भासे. राजवाड्यांत सामानसुमान गालिचे, रुजामे, आरसे, चित्रे, छतें, झालरी वगैरे सुशोभित अशा महालांत ती दासीच्या घोळक्यांत असे हे तिला निर्जन अरण्यांत वेताळवेनेनें पछा-- डल्याप्रमाणे भासे. एकदोन वेळ जे अन्न मिळे ते तिला विषासारखें कडू लागे. रात्रीच्या रात्री झोपेवांचून जात. तिचें मन त्या महालांतून वाटेल तिकडे वाटेल त्या स्थितीचा अनुभव घेऊन येई. गरीब शेतकन्याच्या झोपडीत जाऊन त्याला तेथें राजवाड्यापेक्षा जास्त सुखाचा अनुभव येई. कातकरी, भिकारी, साधारण स्थितींतल्या घरीं, उदम्याच्या घरीं, वाटेल तिथून जाऊन आपल्या वर्तमान- स्थितीची पाहिलेल्या स्थितींशीं ती तुलना करी. त्या प्रत्येकाची स्थिति तुझ्या स्थितीपेक्षां चांगली, अर्से तो मनोरूप दूत लावण्यवतीला सांगे. जन्मठेपेचा कैदीसुद्धां तुझ्यापेक्षा चांगला,' असेही त्याने लावण्यवतीला सांगितले.

 याप्रमाणे त्या मनोरूप दूतानें सर्वोची माहिती सांगितल्यावर तर तिला तिचा तुरुंगवास फार असह्य झाला. पिंजन्यांतील पक्षी पिंजयाचें दार उघडे राद्दा- ण्याची जशी वाट पाहातो तशी ती आपल्या सुटकेची रात्रंदिवस वाट पाहात राहिली.

 वेडी विचारी ! ती राजवाडारूप तुरुंगांतून सुटका व्हावी म्हणून चिंतन करीत होती. जणूंकाय या तुरुंगांतून सुटल्यावर ती सौख्यरूप शिखरावर बसणार आहेत ! अग वेडे ! तुझ्या देहरूपी पिंजऱ्यांत वनोरूप पक्षी जोपर्यंत अस्वस्थ आहेतयंत जगांत कोठेंही आणि कोणत्याही स्थितीत गेलीस तरी त्याला सुख होणार नाहीं हें तुला कसे कळत नाहीं ?

 एक दिवस तिची सावत्र आई, आपल्या दासींसहवर्तमान, आपल्या धाकट्या मुलाच्या वाढदिवसाच्या समारंभाकरितां उद्यानांत गेली होती. तेव्हां ही संधि पाहून लावण्यवतीने मागच्या बाजूची आपल्या महालाची खिडकी उघडली व बागेची शोभा पाहावी, थोडी तरी शुद्ध हवा घ्यावी, म्हणून ती बागेकडे पाहूं लागली तो काय तिचें नशीव ! तिचा जिवलग जिवाचा जीव स्वरूप सिंह त्या वागत महालाची खिडकी उघडेल काय, लावण्यवतीचें दर्शन होईल काय, अशा आतुरतेने वर पाहात होता, तोंच लावण्यतीची व त्याची दृष्टा- दृष्ट झाली. त्याबरोबर त्या दोघांच्याही अंतःकरणांत काय झाले तें सांगणे फार