पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

७९

याची झाली तर ती पाठवावी कोणावरोवर, याची तिला मोठी पंचाईत पडूं लागली.

 इकडे स्वरूपसिंहाची तीच स्थिति होती. फक्त तो पुरुष असल्यामुळे बाहेर हिंडत फिरत होता; लावण्यावतीप्रमाणे वंदिखान्यांत नव्हता. तथापि त्याच्या चाकरमाणसांना केव्हांच फांटा मिळून त्यांच्या जागी नवीन राजा व युवगजा यांच्यातर्फेच फितुरी नोकर आले होते. त्यामुळे त्यासही लावण्या- वतीकडे पत्र वगैरे पाठविण्याची पंचाईत पडली होती. लावण्यावतीचो भेट तरी होईल या आशेनें तो तिच्या माडीखालून दिवसारात्री मिळून दोन- चार खेपा घाली; पण व्यर्थ ! रस्त्याच्या बाजूच्या सर्व खिडक्या बंद ठेवलेल्या असत. रणसिंह जिवंत होता तोपर्यंत लावण्यावतीला गोषा कसा तो ठाऊक नव्हता. पण त्याच्या मृत्यूच्या दुसरे दिवसापासूनच तिला कडक गोपाची शिक्षा अनुभवावी लागली; त्यामुळे ती विचारी आंतल्या आंत झुरे. लावण्यवतीस अर्से वाटू लागले कीं, बापाच्या मृत्यूबद्दल आपल्याला जर मृत्यु आला असता तर फार चांगले झाले असतें. वेडी मुलगी | बापाच्याबद्दल हिला मृत्यु येईल तरी कसा ? शिवाय ज्याचें कर्म त्यानेंच भोगिले पाहिजे.

 भांड्यांत वाफ कोंडून ठेविली असतां ती जशी कोठेंना कोठे मार्ग काढून बाहेर पडते, त्याप्रमाणे लावण्यावती व स्वरूपसिंह ही आपला मार्ग कोणीकडून निघेल या शोधास लागलीं; तो तो त्याचे मेहुणे त्याजवर व त्यांची आई लावण्यावतीवर सक्त नजर ठेवूं लागली. आतां तिला बारादुणे चोवीस तासांत एकान्त असा केव्हांच सापडत नसे. तिला लागेल तो जिन्नस मिळत नसे. फार काय, पण नियमित वेळीं नियमित पदार्थोशिवाय खाण्याससुद्धां कांहीं मिळेनासे झाले. सर्व दुःख कोणाजवळ तरी सांगून कंठ मोकळा करावा असे दिवसांतून कितीदा तरी तिला वाटे. पण व्यर्थ.

 तुरुंगात कैदी असतात ते एकमेकांशी काही वेळ सुखदुःखाच्या गोष्टी बोल- तात व एकमेकांची त्यांना अनुकंपा वाटते; परंतु लावण्यवतीशीं बोलावयास किंवा तिच्या दुःखाची वांटेकरी होण्यास कोणीही नव्हते. तिचे मन वाटेल तिकडे जाऊन येई; परंतु तिच्या शरीरास मात्र तशी मोकळीक नसे. तें जागच्या जागी खिळल्यासारखे असे. ती गुडघाभर उंच मऊ विछान्यावर लोळत असे,