पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
चांदण्यांतील गप्पा

त्यामुळे तिला तीं सारी माणसे परकी वाटत. एक काय जो तिला जिवाचा जिवलग होता तो तिचा भावी पति स्वरूपसिंह राजाची उत्तरक्रिया वगैरे सर्व झालें. दोघे राजपुत्र रात राहण्यास आले. ते ज्या दिवशीं आले त्या दिवसापासूनच लावण्यवतीच्या छळास प्रारंभ झाला. शब्दप्रहाराचीं तर गणतीच नाहींशी झाली. अगोदर प्रिय पित्याच्या दुःखाने तिचे अंतःकरण अगदीं विव्हळ झालेच होते. त्यांत आणखी या शब्दप्रहराने अगदींच त्याचें पाणी पाणी होई. तिच्या तैनातींतील एक एक माणूस कमी होऊं लागलें. तिच्या खासगी खर्चाच्या बाबी हळूहळू कमी होत चालल्या. कदाचित् या मुळींच नाहींशा होतील, अशीही तिच्या पक्षाच्या मंडळीस चिन्हें दि लागली. त्या माणसांनी एक दोन वेळ लावण्यवतीस असे सुचविलें कीं, 'असा असा प्रकार पुढे होणार, तर तूं अगोदरच सावध हो. तुझे भाऊ तुझा हिस्सा, तुला दिलेले उत्पन्न व जवाहीर, हीं सर्व घेऊन तुला बंदींत देखील टाकतील. यासाठीं स्वरूपसिंहासह तूं आपला हिस्सा घेऊन निराळी हो. त्यांचें तुझें जमणार नाहीं. ' ही त्यांची सूचना तिला जरी योग्य वाटली तरी ती तिनें अमलांत आणावी कशी ?

 तिचा पुष्कळच छळ चालू झाला. बाहेर दोघे भाऊ व जनानखान्यांत आई, या तिघांनों तिला व स्वरूपसिंहाला अगदी त्राहि भगवान् केलें. रूपसिंह व भूपसिंह या दोघांनीं दरवारचे मुत्सद्दी आपणाकडे अनुकूल करून घेऊन लावण्यवतीचा हिस्सा अगोदर घशांतं उतरविला. नंतर तिच्या खासगी खर्चाकडे ते वळले, आणि एकंदर जवाहीर वगैरेवरही तिचा हक्क नाहीं असा दरबारांत ठराव करून टाकला. येथपर्यंत तिला त्याचे काही वाटले नाहीं, व वाटायाचे तिचे वयही नव्हते; परंतु तिचा मित्र व भावी पति स्त्ररूपसिंह यांची व तिची दृष्टादृष्ट होऊं नये अशीही त्यांनी तजवीज केली. आजपर्यंत ती आपल्या प्रिय पित्यावरोवर पुरुषात्रमाणे वागत होती. ती बाहेर हिंडा फिरावयास जात होती; पण आतां त्या गोष्टीस मनाई झाली. तिच्या पूर्वीच्या दासी वगैरेंना कमी करून त्यांच्या जागी नर्व्याची योजना झाली. त्या सर्व सावत्र आईच्या शिफारशीच्या होत्या. त्यांच्याकडूनही तिचा आंतल्या आंत छळ होऊं लागला. स्वरूपसिंहाला जर एखादी चिठ्ठी पाठवा-