पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

७७

लग्नाच्या दिवसाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात होतीं. मनुष्याच्या वेताप्रमाणे तंतोतंत गोष्टी घडून आल्या आहेत असे आजपर्यंत कधींच झालेले आठवत नाहीं. त्यांत कांहींना कांहीं उणीव असावयाचीड या नियमाला जणुं बाध येईल म्हणूनच की काय, राजा एक चिंतीत होता व दैव भलतेंच चिंतन करीत होतें ! जिकडे तिकडे लग्नाची कडेकोट तयारी चालली होती. चार दोन दिवस मौज पाहावयाला सांपडेल व कांहीं प्राप्तीही होईल म्हणून आसपासच्या गांवच्या गरीबगुरियांची व भिक्षुकांची गर्दी झाली होती. जिकडे तिकडे आनंदो आनंद चालला होता. इतक्यांत अमृतांत विषबिंदु पडवा त्याप्रमाणें झालें. लग्न दोन दिवसांवर आले. राजा अगदी आनंदांत होता. सर्वत्र तयारी कशी काय झाली आहे, पाहुण्यारावळ्यांची वरदास्त कशी काय ठेविली आहे, मुलीला व जांवयाला देण्याचे जिन्नस कसे काय झाले आहेत, वगैरे देखरेख करण्यांत व पदरच्या लोकांना कामकाज नेमून देण्यांत राजा अगदी गर्क होऊन गेला होता. लग्नाचे आदले दिवशीं लावण्यवतीची मामा मामी वगैरे आजोळची मंडळी आली होती, त्यांना भेटण्याकरितां घोडयावर बसून राजा गेला होता. परत येतांना वाटेत घोडा तुफान होऊन उधळला, व राजा आणि घोडा एका वेशींत ठेचाळून पडले ! त्यासरखें राजाच्या कानशिलास जबरदस्त इजा होऊन तो बेशुद्ध पडला. सेवकांनी उचलून त्याला राजवाडयांत आणले. प्रधान वगैरेंनी वैद्य, हकीम वगैरेंना बोलावून पुष्कळ उपाय केले; परंतु ते सर्व व्यर्थ जाऊन सर्व पसारा व जिव्हाळ्याची लावण्यवती यांना जागच्या जागींच ठेवून त्यानें परलोकीं प्रयाण केलें ।

 लग्नाचे होणारे सोहळे, नागरिकांना व प्रजाजनांना वाटणारी उमेदव प्राप्तीची आशा, सर्व एका क्षणांत लयाला गेली. आनंदाच्या- उल्हासाच्या जागीं दुःख, शोक, निराशा इत्यादिकांची ठाणीं पडलीं. जो मंडळी लग्नसमा- रंभाला आली होती तोच रणसिंहाच्या उत्तरकार्याला उपयोगी पडली. काय दैवाची विचित्र पाहा ! लावण्यवती एवढ्या वैभवशाली घरा.. ण्यांत जन्मली होती, तरी बिचारी एका क्षणांत आज एकटी व अनाथ झाली. मायेचें असे तिला कोणीच राहिले नाहीं. आजोळची माणसें जरी लग्नाकरितां आलीं होतीं, तरी तिची व त्यांची पूर्वीची ओळखसुद्धा नव्हती.