पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ चांदण्यांतील गप्पा स्वरूपसिंह व लावण्यावती दोन्हीं भाऊ भाऊ असें लोक समजत. त्या दोघांची मैत्री विलक्षण होती. एकाच्या पायाला कांटा मोडला तर दुसऱ्याच्या डोळ्याला पाणी येई. एक थ असेल तिथं दुसरा असलाच पाहिजे, असा प्रत्येकाचा समज ठाम झालेला असे. हें त्याचें अकृत्रिम प्रेम पुढें वृद्धिंगत होऊन त्या आतां निराळेच स्वरूप येत चाललें होतें. रणसिंहासही त्या दोघांवांचून एक क्षणभर चैन पडत नसे. तो कोठेही गेला तरी तीं दोन मुलें त्याच्याबरोबर असत. रणसिंहाचे पहिले दोन मुलगे ह्या दोघांचा अतिशय द्वेष करीत. राजाला जरी ते दोघे आवडत नसत तरी त्यानें त्या दोघां मुलांचें कांहीं कमी पडू दिले नव्हते. त्यासही रीतीप्रमाणे अवश्य लागणारे शिक्षण त्यानें दिलें होतें. • त्यांची लग्ने कार्ये सर्व केलीं. फक्त त्यांचे गुण राजाला आवडत नसत, म्हणून • त्यानें त्या दोघांस आपल्यापासून दूर ठेविलें होतें. त्या दोघांचीं नांवें भूपसिंह व रूपसिंह अशी होती. आपल्या राजधानीच्या गांवापासून जवळच एका गांवांत त्यांना व त्यांच्या आईला राहाण्याची सोय करून दिली होती. केव्हां केव्हां - रणसिंह त्यांच्याकडे जाई, व तेही त्याच्याकडे येत. रणसिंहाने त्यांच्याकडे दरबारांतलींही कांहीं कामें देण्याची वहिवाट ठेविली होती. हेतु हा कीं, आपल्या पश्चात् मुलांचा मुलांना राज्याचा वांटा मिळाला म्हणजे कामाकाजाची अडचण पडूं नये, याप्रमाणे तो आपले कर्तव्य करण्यास कधीं चुकला नाहीं. बाकी त्या दोघां • मुलांवर त्याची मुळींच प्रीति नसे. याचे कारण ते दोघेही क्रूर, दुष्ट घातकी होते. त्यांच्या आईचा स्वभावही तसाच होता. त्यामुळेच राजाला दुसरे लग्न करावे लागलें. नशिवाने ती चायको चांगली सुशील निघाली. त्यामुळे तिजवर त्याचें अत्यंत प्रेम जडलें. परंतु ती फार दिवस वांचली नाहीं. तिची मुलगी लावण्यवतीच आतां त्याच्या प्रेमाची एकटी वांटेकरी राहिली. लावण्यवतीचें लग्न करून द्यावयाचें, व तिनेंच बापाचे नांवें मुलीचा राज्याचा भाग ध्यावयाचा ह्या विचारांत तो फार दिवस होता. त्याप्रमाणें त्यानें तजवीजही केली होती. लग्नाचे दिवस आल्यावर तिचें लग्न मोठ्या समारंभानें करण्याचे ठरलें होतें. • त्यासाठी सर्वत्र मोठी तयारी चालली होती. लावण्यवती आत चांगली मोठी झाली होती. स्वरूपसिंहावर तिचें - अतोनात प्रेम जडलें; स्वरूपसिंहाचेंही तीवर प्रेम बसलें होतें. तीं दोघेही