पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

७५

त्यानें 'धूर सोडला, व थोडी आठवण केल्यासारखे करून तो म्हातारा एका समाधीकडे बोट करून म्हणाला: 'ही समाधी लावण्यवती म्हणून मोठ्या राजकुळांतील एक मुलगी होती तिची आहे. हिचा जन्म झाला तेव्हा हिचा बाप मेवाड प्रांताचे राज्य करीत होता. तो मोठा बलाढ्य, शूर, न्याथी व सदाचरणी होता. हिची आईही मोठी शूर आणि पतिनिष्ठ होती. ही मुलगी फारच सुंदर असल्यामुळे हिच्या आईवापानी हिचे नांव लावण्यावती ठेविलें. राजा रणसिंह ( तिच्या बापाचें नांव ) याला पहिल्या बायकोपासून झालेले दोन मुलगे होते. परंतु ते राजाच्या मर्जीप्रमाणे वागत नसल्यामुळे आणि लावण्यवतीची आई लौकरच निवर्तव्यामुळे रणसिंहाचे मुलीवर फारच प्रेम बसले. त्यानें आपल्या राज्याचे व दौलतीचे दोन सारखे भाग करून त्यांतील एक भाग पहिल्या बायकोच्या दोघां मुलांना देऊन टाकिला व दुसरा भाग मुलीला देण्यासाठी ठेविला. मुलगी पण काय होती सांगू ! हे आपण अद्याप पर्यंत असले सुंदर कन्यारत्न पाहिले नाहीं. तिची आईही फार सुंदर म्हणून तिची ख्याति होती; पण मुलगी तिच्या आणखी कितीपटीनें तरी सुंदर ! सांग- तांच येत नाहीं. कवि जसें वर्णन करितात तशी होती.

 तिचे डोळे खरोखर फुललेल्या नीलकमलाप्रमाणे व चंचल दिसत. त्यांकडे पाहिलें म्हणजे क्षणोक्षणीं जसा एखादा मासा पाण्यांत इकडून तिकडे तिकडून इकडे बुडचा मारितो व चमकतो तसे ते दिसत नाकही सरळ सुरेख होते. गाल जणूं गुलाबाच्या पाकळ्याच. ओंठ पोंवळ्यांच्या सरांसारखे दांत केवळ हिरकण्याच. कपाळ विस्तीर्ण असून भांग शुभ्र व बारीक. केश कुरळे. त्यांचे दोन आंकडे नेहमीं कपाळावर येत. हातपाय गोंडस. ती नाजुक व गौरवर्ण जणूं सोनचाप्याची कळी. अशी ती सर्वांगसुंदर मुलगी अंतर्यामांतही सुंदर होती. राजानें तिला घोड्यावर बसणे, दांडपट्टा वगैरेंत मुलाप्रमाणें तरवेज केली होती. ती नेहमीं मुलासारखा पोशाख करून हिंडत असे व आपल्या बापाबरोबर फिरत असे. राजाच्या मावसबहिणीचा मुलगा तिच्या गुणांस रूपास योग्य असा होता. तोच आपला भावी जांवई म्हणून राजानें जवळ बाळगला होता. लावण्यवती व स्वरूपसिंह यांची बाळपणीं मैत्रीही मारी जडली होती. दोघांचे शिक्षणही बरोबरच होत असे. लावण्यवती पुरुषवेषांत असल्यामुळे