पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
चांदण्यांतील गप्पा

पाणीविणी आणून रात्रीचे कांहीं कोणाला खाणेपिणे करावयाचें ते सर्व उरकलें, व आपआपल्या पथाय पसरून पडलों.

 रात्रीचा पहारा करण्यास पहिल्या प्रहराची मंडळी नेमिली त्यात माझी योजना झाली. मला तेच हवेंच होतें. ह्या पादुका ( म्हणजे समाधी ) व ते झाड यावद्दलची माझी जिज्ञासा मला कांहीं केल्या उगीच बसूं देईना. 'एवढी मोठी गढीसारखी ही इमारत ! ती ज्याच्यासाठी बांधिली त्या देवाला देऊळ कसे नाहीं ? ' हा विचार वारंवार मनांत येऊन आश्चर्य वाटे. यासंबंधाची चौकशी करावी असा मनाचा पक्का निश्रय मीं केला. निश्चय केला खरा, पण तो सिद्धीस कसा जावा ? कोणाजवळ चौकशी करावी ? ह्या ओऱ्या किंवा झाडें थोडींच वाचा फुटून मला झालेली हकीकत सांगणार आहेत ! पण उद्योग केला असतो थोड़े तरी फळ मिळतेच, अर्से जे म्हणतात, त्याचा मला या प्रसंगों अनुभव आला. आम्ही आमच्या सामानसुमान लावण्याच्या व जेवणाखाण्याच्या गडबडीत अस- ल्यामुळे तेथें एक म्हातारा रजपूत होता त्याजकडे आमचें लक्ष गेले नाहीं. नंतर चौकशीअंती मला तो तेथेंच राहतो असे कळले. त्याचे विग्हाड एका ओरीला कूड करून तीत त्यानें ठेविले होते. संध्याकाळीच त्याने त्या समाधीशी दिवा लावून ठेविला होता. तेथेंच तो नामस्मरण करीत बसला होता. मी त्याच्याजवळ जाऊन बसलों व इकडच्या तिकडच्या थोडया गोष्टी झाल्या ' संध्याकाळ आभाळांत दिसलेल्या एकंदर देखाव्यावरून आतां पाऊन एकदोन दिवसांनी फार जोरानें येईल, मग तुम्हां यात्रेकरूंची फार त्रेधा उडेल .' इत्यादि बोलणे गुडगुडीच्या झुरक्यांत चालले होते. मी त्यास तुम्हीं कोठचे राहणारे वगैरे विचारिलें, व मुख्य मुद्यावर येऊन ठेपलों. 'ही समाधी कोणाची ? या ओच्या कोणी बांधल्या ? व एवढा खर्च करून ज्यानें ओच्या बांधल्या त्यानें समाधीवर आच्छादन कसे केले नाही ?? वगैरे प्रश्न मी त्यास केले. म्हातारा म्हणाला, "ती" फार मोठी लांब हकीकत आहे. ती सर्व सांगू लागलों तर रात्र पुरावयाची नाहीं. ! " असे त्यांनी सांगितल्यावर तर माझो जिज्ञासा अधिकच वाढली. मी त्यास म्हटले, ' सांगण्यास काही हरकत नसेल तर ती हकीकत मला सांगाल काय ?"

 तो म्हणाला: "हरकत कशाची ? ती ऐकणाराच आजकाळ दुर्मिळ आहे. ' म्हणून त्यानें पुनः गुडगुडीचा झुरका ओढिला व आकाशाकडे तोंड करून असें