पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लावण्यवती

७३

एवढचा एका क्षणाच्या देखाव्याचे नुखते वर्णन करून सांगणेसुद्धां ज्याला कठीण, तो यापैकी एखादा रंग तयार करीन म्हणेल तर त्याला करितां येईल काय ? असो. अशा त्या संध्यासमयीं आम्ही ती सर्व शोभा पाहाण्याच्या नादांत वाट चालणेसुद्धां विसरलों; पण सूर्य खाली गेल्यावर ती शोभा जसजशी हळूहळू कमीकमी होत चालली, तसतसे आम्हीही सर्व थोडथोडे भानावर येऊन रात्रीच्या मुक्कामाची वाटघाट करूं लागलो. आतांपुढे वाट चालणे शक्य नव्हतें. जवळ एखादा मोठासा गांवही नव्हता. आजच्या मुक्कामाला चांगली निवान्याचीच जागा पाहिजे होती; कारण या सर्व आकाशाच्या देखाव्यावरून रात्री पाऊस खास पडेल असे चिन्ह दिसत होते. आम्हां इतक्यांना जागा तर निवायाची. मिळाली पाहिजे. अश्या विवंचनेंत पडलों होतों व हळूहळू वाटही चालूं लागलो होतों. तो एका गुराख्याला जागेवद्दल विचारितां त्यानें सांगितले; "या नदीच्या पलीकडे लावण्यमहाल आहे तेथें जा. तुम्हांला सगळ्यांना उतरावयाला पुरेल एवढी मोठी ती जागा आहे' हे ऐकून आम्हा सर्वांना थोडा धीर आला व आम्ही लवकर लवकर चालू लागलों. नदी उतरून पलीकडे गेलों तो रस्त्याला सोडून पूर्वेच्या बाजूला अगदी नदीकिना-याला व डोंगराच्या माचीला लागून एक मोठा दगडी कोट दिसूं लागला. कांही मंडळी पुढे सरसावली. जागा वगैरे पाहून आल्यानंतर वाकीच्या मंडळीस त्यांनी सांगितले; 'जागा फार उत्तम आहे पण निर्जीव प्रदेश आणि डोंगराचा पायथा आहे. चोराविलटांची फार भीति आहे त्यावर बराच खल होऊन त्यांनी असे ठरविले की, सगळ्यांनी आळीपाळीने रात्रीचा पहारा करावा व कशी तरी रात्रीची वेळ काढावी, आणि पहांटे उठून रस्त्याला लागावें. तो वेत सगळ्यांच्या पसंतीस पडला. सर्वजण त्या बाजूला वळलों. त्या कोटाच्या आंत गेलों तो स्नूप लांबपर्यंत चौफेर सुरेख चांगल्या ओग्या बांधलेल्या होत्या. मध्ये दोन लहान समावि व त्यावर एक बकुळीचें झाड उगवले होते. आम्हाला वाटले की, त्या श्रीदत्ताच्याच पादुका आहेत. म्हणून आम्हीं कांहींनी त्यांपुढे पैसे डेवून मोठ्या भक्तिभावानें नमस्कार केले. भोंवतीं एवढ्या मोठ्या ओन्या असून मध्ये देवाला देऊळ कसें नाहीं या दोन समाधि कोणाच्या असाव्या-याचें सर्वांना मोठे नवल वाटले. आम्ही सर्वोनों आपली बिन्दाडें लाविलीं, नदीचें