पान:चांदण्यातील गप्पा.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वाटली की काय कोण जाणें ! तो कांहीं आम्हांला पावला नाहीं. झालें, लग्न- वेळा आली, मंगलाष्टके संपली, टाळी पडली, अक्षता पडल्या, अंतरपाटा- बरोबर आमचा भ्रमही दूर झाला ! आमच्या गळ्यांत घोरपड पडली व घोरपडीच्या गळ्यांत आमच्या हातांतली माळ झडली ! हा प्रसंग आम्ही विसरणें शक्य नाहीं !" आपली पत्नी सुशिक्षित व्हावी, अशी त्यांना हौस वाटे; पण त्यांनी असावी, नामांकित लेखिका यासंबंधानें शिकस्तीचा प्रयत्न दिसत नाही. असो. मुंबईमध्ये या वेळीं प्रार्थनासमाज होता. त्यांत पराववारी करितां व्याख्याने होत. त्या व्याख्यानांला जाण्याविषयीं गोविंदरावांची आपल्या पत्नीला सक्तीची आज्ञा असे. भूगर्भशास्त्र, रसायन, विद्युत्, भूगोल, खगोल, ताम्यांची गति, चंद्रसूर्यौची ग्रहणे, वातावरण, असल्या प्रकारचे व्याख्यानांचे विषय असत. समाजाचे सेक्रेटरी कै. सदाशिवराव केळकर होते. व्याख्याते ते स्वतः किंवा आळीपाळीनें दुसरे कोणी तरी असत. या व्याख्यानांचा योग काशीताई कशा साधीत याचें वर्णन त्यांच्याच शब्दांनी देतों. त्या म्हणतात: " व्याख्यानाची वेळ दुपारी दोन ते चार असे. या वेळी घरांतील वडील मंडळी विश्रांति घेत पडलेली असे. त्यांना विचारल्याशिवाय सासूरवासिनीने घराच्या बाहेर पाऊल टाकावयाचें नाहीं, व मी व्याख्यान ऐकावयास जाऊं कां ?' म्हणून विचारणें तर केवळ सुळावरची पोळी काढून खाण्याइतके सोपें ! न जावें तर भयंकर रागाला वळी पडावयाची ! अशा अत्यंत कचाटीत सांपडलें असतां शाल व जोडा पदराखाली लपवून मागेपुढे पहात पहात मागल्या बोळाने मी एकदांची बाहेर पडून रस्त्याला लागे ! परत येते वेळों शाल व जोडा तबेल्याच्या खिडकींतून घोडया च्या गवताच्या ढिगावर टाकून हळूच अंति येई. असा चोरटा व्यवहार कित्येक महिने चालला होता. रविवार अस ल्यामुळे घोडेवाला घरीं असे. बाहेर पडण्यास व आत येण्यास त्याचे साहाय्य होत असे. तो कधीं कधीं रविवारी सकाळीच माझी शाल व जोडा गाडीत नेऊन ठेवी व संध्याकाळीं मीं खिडकीतून टाकलेला जपून वर आणून ठेवी. एवढ्याबद्दल त्याचे मला अतोनात उपकार वाटत. "