पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९ )

 या रविवारच्या सभांतून नेमलेल्या विषयाची चर्चा होत असे. श्रोतृ- चर्गाने आपले मत सांगावे अशी व्याख्यात्याची इच्छा असे. काशीताई आपले मत सांगण्याचे धैर्य करीत. याचा फायदा घेऊन निर्भीडपणे पण काशीताईशिवाय कोणी बोलत नसे. असे, त्यांची केवळ करमणुकीची असे, चिटणीस रा. केळकर यांनी कित्येक बायका सभेला जात, काशीताईंची दृष्टि ज्ञानार्जनाची असे दिसत असे. एके प्रसंगीं सभेचे 'हल्लींच्या स्त्रिया व पूर्वीच्या स्त्रिया' या विषयावर एक निबंध आणण्यास जमलेल्या स्त्रियांना विनंति केली. काशीताईंनी स्वतःशी विचार करून एक लेख आप्ताकडून त्याची शुद्ध व सुबक नक्कल करून तो पुढल्या रविवारीं सभेत वाचला. सभेच्या व्यवस्थापकांस तो फार आवडला व तो त्यांनी शीताईंपासून मागून घेतला. त्या निबंधाचे पुढे काय करणार हें काशीताईंना माहित नव्हतें. सदर निबंध केळकरांच्या हवाली करून त्या घरी गेल्या. पुढच्या रविवारी काशीताईंच्या घरीं झोपाळ्यावर 'सुबोध पत्रिके'चा अंक येऊन पडला. त्यांत अगदी आरंभींच काशीताईंच्या नावासह त्यांचा निबंध छापलेला दृष्टीस पडला ! मग काय विचारतां ! काशीताईंवर मोठाच गहजब झाला ! या घोर अपराधाबद्दल त्यांच्यावर घरांतील अवघड व श्रमाचीं कामें लादण्यांत आली व त्यांच्या तोंडाला कुलूप ठोकण्यांत आलें. अशा स्थितीमध्ये शेंकडों वेळां देहाचें विसर्जन करावें असेंसुद्धां त्यांच्या मनांत येई ! रविवारी प्रार्थनासमाजांत चोरून तरी जावयाला सापडे, यामुळे तो दिवस वरील स्थितीत काशीताईंना फार आनंदाचा व उल्लाखाचा वाटे; कारण सात दिवस कुलूप त्यांस तेथें उघडतां येई व समाजांत अगदी मोकळेपणाने बोलता येई; यामुळे त्यांच्या मनाला थोडा विरंगुळा वाटे. यापुढे महिन्यांतून एखाद दुसरा निबंध त्या लिहित व वाचीत, पण तो प्रसिद्ध करू देत नसत. समाजातील व्याख्याने ऐकून शास्त्रीय विषं- यांची गोडी काशीताईंना लागली. त्यांनी मराठीतील प्राथमिक शास्त्रीय पुस्तकें वाचलीं. तसेंच मंडलिकांचा इतिहास, अर्थशास्त्र, कादंबरीसार,