पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ७ )

असिस्टंट एक्झिक्युटिव एंजिनियरच्या हुद्यावर होते. हे आपल्या कामत फार कुशल असल्याबद्दल त्यांची ख्याती होती. आपल्याप्रमाणें आपली पत्नी सुशिक्षित व सुसंस्कृत असावी असें गोविंदराव यांस वाटणे साहजिक होते. मुंबई शहरांत स्वतःच्या घरांत वस्ती, गर्भश्रीमंती, तारुण्य, सौंदर्य, यांचा योग गोविंदरावांना आला होता. त्यांत वुइल्सन, एल्फिस्टन, झेवियर या कॉलेजांत उत्तम प्रोफेसरांच्या मुखानें रमणीय आंग्लवाङ्मयांत त्यांचा प्रवेश झाला होता; यामुळे त्यांच्या अंगी रसिकता उत्पन्न इालेली, होती. जेन ऑस्टेन, जॉर्ज इलियट, मेरी कोरेली, मिसेस बाह विद्याविभूषित आँग्ल स्त्रियांची चरित्रे व लेख त्यांच्या वाचनाचे व विचा- राचे विषय झाले होते. असल्या गृहस्थाच्या डोळ्यांपुढे कोणत्या प्रकारची आदर्शभूत पत्नी असेल बरें ? रमणीय कल्पनासृष्टीत संचार करणाऱ्या असल्या तरुण गृहस्थाच्या गळ्यांत एका कर्मठ गृहस्थाची र ट फ शिकलेली मुलगी पडावी हा आपाततः दुर्दैवाचा प्रकार दिसतो; पण त्या वेळची परिस्थिति पाहिली असतां असल्या प्रकाराविषयीं आश्चर्यही वाटावयाला. नको. खुद्द गोविंदराव एखादे वेळी रंगांत आले असता आमच्यापाशी या वैवाहिक प्रसंगासंबंधानें मोठें चटकदार वर्णन करीत. ते म्हणतः " आमचे आजोबा म्हणजे निव्वळ जमदग्नि होते ! या बोवांची आम्हांला फारच भीति बाटे यांच्यासमक्ष जेवणखाण देखील आम्हांस सुचत नसे. त्यांचे नांव घेतलें कीं, आमचा थरकांप होई. यांच्याकडे घरांतील सर्व व्यवस्था असे. याच बोवांनी आमचें लग्न जुळवून आणले. मुलगी काळी समंजस कीं वेडगळ सुरूप की गोरी, उंच की टेंगणी, लह को सडपातळ, कीं कुरूप, कांहींच आम्हांला पत्ता नाहीं ! लग्न जुळलें ! तिथिनिश्चय झाला. जिच्याशी आमच्या जन्माच्या गांठी पडावयाच्या तिची माहिती आम्हांला कांहींच नाहीं, व दर्शनाचे तर नांव नाहीं ! आम्ही खूप संतापलों, तडफडलों, मनांत त्या म्हाताऱ्याला शिव्याशाप दिले, कुठे तरी पळून जावें असेंही बाबूं लागलें ! पण कांहीं उपाय चालेना. त्या म्हाता-याचे निमूटपणे ऐकावें. लागलें. मंगलाष्टके चालली ते वेळीं आम्हीं परमेश्वराचा धावा केला कीं, देवा ! या संकटांतून आम्हाला मुक्त कर; पण देवालाही त्या म्हाताऱ्याची भीति