पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोष्ट ५ वी.
" लावण्यवती.



 पांचवी गोष्ट सांगण्याची पाळी एका म्हाताऱ्या आजोबांवर आली. आजोबांना आम्ही सगळी आग्रह करीत होतों कीं, तुम्हीं कांहीं तरी गोष्ट सांगा. अजोबा म्हणत: “मला कसली गोष्ट सांगतां येते? तुम्हीं सांगा. मी आपला ऐकतो म्हणजे झालें! " आम्ही म्हणावें, "ते कांहीं चालावयाचें नाही. येथल्या झालेल्या ठरावा- प्रमाणें तुम्हांला गोष्ट सांगितलीच पाहिजे !” असा आग्रह केल्यावरून एकदांचें म्हातान्यानें कबूल केले. आम्ही सर्व रोजच्यासारखी कोंडाळे घालून बसलो. मी आपल्या पतकरलेल्या कामाची तयारी करून घेतली. आजोबा माझ्या अगदी नजीक बसले.

 त्या बसलेल्या मंडळीपैकी एक मुलगा त्यांना म्हणाला: " हूं आजोबा, सांगा गोष्ट. " तेव्हां आजोबा हंसत हंसत म्हणाले : " काय बेटयांनी माझी पाठ पुरविली आहे सांगा गोष्ट सांगा गोष्ट म्हणून ! सांगतों तर ऐका. " असें म्हणून त्यांनीं त्या मुलाला चापट दिली व आपल्या कमरेची डवी काढून तपकिरीने आपले नाकाचें माप भरले. नंतर आजोबांनी गोष्ट सांगण्यास आरंभ केला. " मध्येच कोणी गडबड कराल तर सांगेन कसे काय तें - " असे म्हणून लहान लहान मुलांना दरडाविलें. कांहीं वेळ आठवण केल्यासारखे करून ते म्हणाले, “मी जी गोष्ट सांगणार ती मीं प्रत्यक्ष पाहिली नाहीं. मलाही अशीच एकानें ती सांगितलेली आहे. ती मी तुम्हांला सांगतों. तींत कमी जास्त अथवा असंभवनीय असा भाग तुम्हांला वाटेल; परंतु त्याला कांहीं इलाज नाहीं. मी ऐकली तशीच ती मी तुम्हांला सांगतों.

 एकदा फार दिवसांपूर्वी मी यात्रेला गेलो. तेव्हां तुमच्या ह्या आगगाडया बिगगाड्या नव्हत्या. आम्ही पुष्कळ मंडळी मिळून पायवाटेने गेलो होतों. बैलगाउयासुद्धां तेन्हां एवढया जिकडेतिकडे जात नसत. कांहीं कांहीं ठिकाणी