पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसबाग

६९

चायांपाशी व्हावा या हेतूनें काशीस निघून गेल्या. जाण्यापूर्वी त्या साध्त्री पवित्र मथुराबाईची गणपतीच्यासमोर समाधी बांधली, आणि तिची पूजा, नेवैद्य, दिवा बगैरेची व्यवस्था करून ठेवून त्या गेल्या. रघुनाथरावाची सर्व संपत्ति साव- कारांच्या वरांत जाऊन जे कोटयाधिश गोविंदनाईक, त्यांचा दत्तक मुलगा आतां दारोदार भीक मागत फिरत आहे ! बायकोनें मरतेवेळीं आईला सांगि तल्यावरून तिने रघुनाथरावास दोन हजार रुपये दिले होते, तेही गेले. ती त्यांची मंडळी आतां कोणीकढच्या कोणीकडे नाहींशी झाली. त्या अप्सरा आतां यांना ओळख देखील देत नाहींत ! आणि हे असे भटकत असतां एखाद वेळ ' राम' म्हणतील झाले ! अशी कथा पुजारीबोवांनीं सांगतली.

 गोष्ट सांगणारे गृहस्थ जनार्दनपंत म्हणाले- ' आहे की नाहीं कर्माची गति गहन ? "