पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
चांदण्यांतील गप्पा

तील पाण्याने सतारीच्या तारा भिजत त्या पुसण्याकरितां म्हणून थोडया थांवत याप्रमाणे चालले असतां त्यांस एक दिवशीं एकाएक मुर्च्छा येऊन त्या बसल्या ठिकाणीं पडल्या. त्यांच्या आईन त्यांना वारविरा घालून सावध केल्या. यावेळी साधारण मनुष्याच्या तोंडांतून 'आई' हा शब्द अगोदर आला असता. पण मथुरावाईचा इतका दृढनिश्चय कीं, ती स्वाभाविक संवयसुद्धा त्यांनीं सोडून दिली असल्यामुळे, 'गजानन ! गजानन ! अशींच अक्षरें त्यांच्या तोंडांतून आली.


 अशासारखी त्यांची स्थिति वारंवार होत असे. दुःखाचा वेग असह्य झाल्याने त्या देवापुढे गातां गातां पुष्कळ वेळ मूच्छित होऊन पडत; पण यावेळी त्यांच्या दुःखाला जबरदस्त भरती आली व वान्याच्या सोसाटयानें केळ जशौ धाड्कन् खाली उमळून पडावी, तशा मथुराबाई दुःखावेगानें धाड्कन् जमिनीवर निचेष्ट पडल्या. त्यांची सतार एका बाजूला पडली. जमिनीवर आपटल्यामुळे तिच्या तारांतून नाद निघत होता; तेव्हां जणुं आपल्या यजमानिनीची झालेली स्थिति पाहून ती रुदनच करीत आहे, असे वाटले.

 याप्रमाणे आज पांच वर्षे कम चालू आहे. वर सांगितल्याप्रमाणे रघुनाथराव एकवेळ आले आले होते; त्यावर कांहीं आके नाहींत.

 अशी त्या करुणमूर्तीची गोष्ट ऐकत ऐकत आम्ही तळ्याच्या पलीकडे होडींतून उतरून उभे होतों. संध्याकाळ झाली म्हणून आम्ही घराकडे आलों व पुजारीबोवा आपल्या कामाला गेले. मला आपली ती भले मोठे कुंकू लावलेली सुंदर व कृश करुणमूर्ति सारखी डोळ्यांसमोर दिसत होती. त्यापुढे मी कांही दिवसांनंतर तिच्या नवऱ्याचा शोध करून असले रत्न ज्या नरपशूच्या गळ्यांत ब्रह्मदेवाने बांधले होते त्यास प्रत्यक्ष पाहिले. खरोखरच बुवा तो नरपशु ! मी पाहिला तेव्हा त्याच्या अंगावर धड चिरगुटसुद्धां नव्हतें, व रस्त्याने तो झुकत झुकत चालला होता !

 पुढे बरेच वर्षांनी मला ते पुजारीवोबा भेटले. तेव्हां मी त्यांस मथुराबाईची हकीकत विचारली. त्यावरून कळले कीं, मथुराबाईची आई व मथुराबाई या दोघीही तेथेंच वारल्या. त्यांच्या ज्या दुसऱ्या दोन सावत्र आया होत्या त्यांनीं मथुराबाईची सर्व संपत्ति धर्मार्थ ठेवून त्या आपल्या आयुष्याचा शेवट श्रीविश्वेश्वराच्या