पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसवाग

६७

घालण्याचे टाकिले आहे. त्यांच्या लांब लांब केसाला खाली तेवढी एक गांठ असते. मृगाजिन व पांढरी घोंगडी मात्र त्या निजावयाला घेतात. शुभ्रवस्त्र नेसतात. बागेत आल्यापासून भगवन्नामाशिवाय अक्षरही बोलत नाहींत. चाल- तांना आपल्या पावलांकडे दृष्टि देऊन चालतात. त्यांच्या मनाला कांहीं वाईट वाटले, झोप आली नाहीं, तर त्या आपली सतार घेऊन जेव्हां पाहिजे तेव्हां गणपतीसमोर बसून गातात. गात असतां त्यांच्या डोळ्यांतून एकसारखे अश्रु वाहात असतात. त्यावरून त्यांच्या मनाला दुःख झाले आहे, असें माणसानें ताडावें. बाकी त्या आपल्या तोंडानें कोणाजवळ कांहीं एक बोलत नाहींत. मनास दुःख झाले म्हणजे ते दुसन्यास सांगितले असतां थोडें हलकें होतें. पण मथुराबाईनीं दुःख कमी करण्याचा तो मार्गच बंद करून टाकिला. हृदयावर दुःखाचा भार अतिशय होऊन तो असह्य झाला म्हणजे त्या दुःखाला, देवासमोर चसून, नेत्रावाटे बाहेर लावतात. त्यांच्या मनातील विचार, कल्पना वगैरे काहीं एक मनुष्याला कळत नाहींत. फक्त त्या संकटहरण- चिंतामणीला काय कळत "असेल तें खरें, झोपेशिवाय त्यांच्या रात्रीच्या रात्री जातात. पण त्या सर्व गजाननाच्या नांवाचे भजन करण्यांत त्या घालवितात. या त्यांच्या अशा वृत्तीमुळे त्यांच्या आईला अत्यंत दुःख होते. पण बिचारी करते काय ? तीही मथुराबाईप्रमाणेच दिवसेंदिवस कृश होत चालली आहे. तिनेही एक वेळ अल्प आहार करण्यास सुरवात केली आहे. फार काय, मथुरावाईकरितां दुःख करून करून ती आज दोन महिने अंथरुणाला खिळली आहे. तीही येथेंच आहे. देवा- चन वगैरे झाल्यावर मथुराबाई थोडा वेळ आपल्या आईचीही सेवाचाकरी करि तात. त्या दोघींना स्वयंपाक वगैरे करून घालण्यास त्यांची वडील आई येथे येऊन राहिली आहे व मधली घर संभाळण्यास गांवांतच राहिली आहे. मथुराबाईचे यजमान एकवेळ येथे आले होते; त्यावेळी मथुराबाई आतांप्रमा- णेंच सतार घेऊन देवापुढें गात वसल्या होत्या. त्यांच्या आईने त्यांस रघुनाथराव आल्याचे सांगितले. पण मथुराबाई त्यांच्याशी एक शब्दही बोलल्या नाहींत, किंवा त्यांनीं त्यांच्याकडे पाहिलें नाहीं, अथवा आपली सतार ठेवून त्या गाणे म्हण- ग्याच्या थांवल्या नाहींत. एकसारखी गणपतीकडे दृष्टि लावून त्या सतारीवर गात होत्या. डोळ्यांतून सारखे अश्रु वाहात होते. घसा दाटून येई म्हणून व डोळ्यां-