पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
चांदण्यांतील गप्पा

माझे आयुष्य मीं परमेश्वरचिंतनांत घालविणार. हा माझा पक्का निश्चय झाला आहे.”

 यानंतर तिनें आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली, व झालेला निश्रय काल- त्रयीं ढळणार नाहीं अर्सेही सांगितले. तिच्या आईनें तिची अनेकप्रकारें समजूत घातली. 'असे पुरुष पुष्कळ असतात. तुझा नवरा आज नाहीं उद्यां तरी ताळ्या- वर येईल. ' पण ती म्हणाली: 'मी नुस्ती घरीत असल्यापासूनही जर त्यांना अडचण होऊन त्यांच्या सुखाला व्यत्यय येतो, तर तेथे राहून दुसऱ्याच्या सुखाचा काय म्हणून विघाड करावा ? मी आतां एखाद्या एकांतस्थळी जाऊन आपले आयुष्य घालविणार. संसार नाहीं तर परलोकसाधन तरी होऊं दे ! त्यावर त्या त्रिवर्गांनी तिला पुष्कळ सांगितले. पण मथुराबाईचा निश्चय म्हणून ढळला नाहीं. तेव्हां आपणही तुजबरोबर येतों, म्हणून त्यांनी तिला सांगितले. 'तूं एकटी तरुण मुलगी कोठें जाशील ? आमचा जीव येथें कसा राहील ? आम्हांला तरी आतां काय सुख ? काय जें सुख ते तुजपासून मिळावयाचें; ती तूंच जर बाई विदेही होऊन तीर्थयात्रा करूं लागलीस तर मग आम्हांला काय करायचें इथे राहून ? आम्हीही आपली तुजबरोबर तयारी करितों' शेवटीं बरोबर येण्या- विषयी त्यांचा फारच आग्रह दिसला, तेव्हां मथुराबाईनें दूर एकांतस्थळ जाण्याचा आग्रह सोडला. आणखी या ठिकाणी श्री. गजाननाची सेवा करून राहाण्याचा निश्चय केला. त्याचप्रमाणे त्या व त्यांच्या आयांपैकी कोणीतरी एक त्यांच्याजवळ असतात. आयांपैकी एक एक जण आळीपाळीने येतात. पण मथुराबाई जी एकदां होडींत वसून या वळांत व बार्गेत आली आहे, तिनें कांहीं पुनः होडींत पाय टाकला नाहीं.

 आतां येथें आल्या दिवसापासून मी त्यांचे नित्यकृत्य पाहतों तों तें येणें- प्रमाणे असतेंः-पहाटे तीन वाजतां उठून सतार घेऊन तास दीडतास देवाचों पढ़ें म्हणावयाचीं; त्यानंतर प्रातर्विधि आटोपून तळ्यावर स्नान करून देवार्चन करावयाचें; नंतर प्रदक्षिणा घालावयाच्या त्या माध्यान्हीला दिवस येईपर्यंत घालावयाच्या एकवेळ अळणी मिठाशिवाय आहार करावयाचा. नंतर पोथी वाचीत बसावयाचें. तिसऱ्या प्रहरीं पुन: आपली सतार घेऊन आतां आपण पाहिल्याप्रमाणे देवापुढे गात वसतात. मथुरावाईंनी येथे आल्यापासून वेणी