पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसबाग

वळणाजवळ आली व आपणास आतां हें घर पुन्हा दृष्टीस पडावयाचें नाहीं म्हणूनच की काय, थोडीशी तेथूनच ते आपल्या सासन्याचें घर तिनें मार्गे वळन डोळे भरून पाहिले. एक मोठा दीर्घ सुस्कारा टाकून वळुनः मान मागे वळून आपल्या पावलाकडे दृष्टि देऊन ती चालूं लागली.

 माहेरच्या घरीं तिच्या तिघीही आया जेवावयाला मथुरेचीच वाट पाहात बसल्या होत्या, तो मथुराबाई आल्या; परंतु जेवायाचें नाहीं, असे त्यांनी दारां- तूनच सांगितले व त्या वर गेल्या. त्यांच्या आयांच्या मनांत 'ही घरून जेवून आली असेल' असे समजून त्या आपल्या जेवावयास बसल्या.

 मथुराबाई जी माडीवर गेली ती उगीच बसली नाहीं. तिनें आपले अंगा- वरील सर्व दागिने काढून पेटींत ठेवले. दऊत लेखणी घेऊन आपली सर्व संपत्ति पुन: आपल्या आयांच्या नांवानें लिहिली आपल्या उंची लुगड्यांचा व चोळ्यांचा धर्म करून टाकिला. आणखी पांढरे शुभ्रवस्त्र परिधान केलें. फक्त नाकांत बारीकशी नथ व पायांत जोडवीं एत्रढे अंगावर ठेऊन, दोन तीनशे रुपये बरोबर घेऊन, तो आपल्या आईजवळ आली ' मी आज संध्याकाळी जाणार ! ' एवढे शब्द मोठ्या कष्टानें उच्चारून हातांतला कागद तिनें आईपुढे टाकिला. पुढे कांहीं बोलवेना म्हणून • तिनें एकदम वैठक मारिली व गुडघ्यांत मान घालून रडूं लागली. हा काय प्रकार आहे, हे त्या विचाया आयांना कांहींच कळेना. तिची थोरली आई जवळ येऊन तिनें तिला पोटाशी धरलें व तुला काय झाले ? तूं कोठें जाणार ? कोण तुला बरोबर नेतो ? ' इत्यादि प्रश्न केले. पण मथुराबाई कांहीं वेळ कांहींच बोलल्या नाहींत. मग थोडे दुःख कमी झाल्यावर त्या आपल्या वडील मातोश्रीस म्हणाल्याः-

 “आई,परमेश्वराने मला संसार करण्याकरितां, तुम्हांस सुख देण्याकरितां किंवा बाबांचा वंश चालविण्याकरितां जन्मास घातलें नाहीं, है मला आज पक्कें कळलें. मीं आयुष्य तीर्थयात्रा करून परमेश्वर भजनांतच घालवावें, अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही आतां बाबांचा वंश चालविण्याकरितां दत्तक घ्या. मला दिलेली संपत्ति मी सर्व तुमची तुम्हांस परत दिली आहे. त्यांतून यात्रेच्या भाडयापुरते पैसे मात्र मी तुमच्या परवानगीनें घेतें. आजपासून