पान:चांदण्यातील गप्पा.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
चांदण्यांतील गप्पा

 याप्रमाणे गोविंद नाईक व गोपाळ नाईक यांच्यामार्गे पांचसात वर्षे गेलीं. एक. दिवस दोन प्रहरीं कांहीं नैमित्तिक असल्यामुळे मथुराबाई माहेरी गेल्या होत्या. त्या आपल्या नियमाप्रमाणे सासरी? यावयाच्या होत्याच. पण त्यांच्या पतिराजांना व त्यांच्या चांडाळचौकडीला वाटले त्या येणार नाहींत. म्हणून, त्यांनी रघुनाथ-- रावांच्या नवीन प्रियपात्रापुद्धां माजघरांत जेवण्याचा बेत केला व त्याप्रमाणें सर्व आपापल्या इच्छेप्रमाणे जेवावयास बसले. जेवणांत कांहीं तरी वडवडणें एकमेकांच्या पानांत अन्न फेंकर्णे, मोठमोठयानें होसणे, खिदळणे, हे सारखे चालक होतं, तोंच मागच्या दारानें मथुराबाई आल्या. त्या आल्या असे कळतांच त्या सर्वोना राग आला. रघुनाथराव त्या रागाच्या भरांत जरा मोठ्यानें म्हणाले, “आलीच शेवटीं पिडा ! मी म्हटले आज तरी टळेल ! ” हे रघुनाथरावांचे शब्द स्वयंपाकघरांत मथुराबाईच्या कानावर पडले. ते ऐकून त्यांना पराकाष्ठेचे दुःख झाले. तो चाललेला प्रकार व आपल्या येण्याने सर्वोच्या आनंदांत विरजण पडले हे पाहून त्यांना फारच वाईट वाटले. 'याउपर आपण या घरांत पाणी- सुद्धां घेणार नाहीं' असा निश्चय करून त्या मागल्या दारी कांहीं वेळ आपल्याशीं खूब रडल्या. काही वेळ तेथें वसून त्यांनी आपल्या मनाशी पक्का विचार केला व आल्या तशाच मागल्या दाराने त्या कायमच्या बाहेर पडल्या. मथुराबाईच्या पावलांबरोबर गोविंद नाइकाची कीर्तिलक्ष्मी व संपत्तिलक्ष्मी या दोघींनीही आपली पावले रघुनाथरावाच्या घराबाहेर टाकलीं. त्याही मथुरावाईप्रमाणेच आपल्या विटंबनेला कंटाळल्या होत्या; परंतु गृहलक्ष्मी जी मथुराबाई तिचे सहवाससुखाचा जो अलम्य लाभ घडत होता त्या लाभाला भुलून मथुरावाईप्रमाणेच त्या आपला जीव मुठीत धरून राहिल्या होत्या. पण गृहलक्ष्मीच जेव्हां त्या घराचा त्याग करून चालती झाली, तेव्हां त्या कोणाच्या आधारावर राहाणार ? त्यांनींही तिचेबरोबर अंगप्रस्थान ठेविलें. भर दोनप्रद्दरची वेळ; उपाशींतापाशीं; रडून रडून डोळे लाल झालेले; गालांवरून पाण्याचे ओघळ पडून, वरचेवर पुसल्यामुळे गुलावाची पाकळी चोळवटावी तसे चोळवटलेले तिचे गाल; ओंठांची लाली जाऊन त्याऐवज त्यांस निळवट- पणा आलेला, मन दुःखभारानें दडपून गेल्यामुळे पाऊल टाकण्यासही शक्ति नाहीं; कशी तरी शरीरास ओढीत नेत आहे; अशी ती मधुराबाई एका रस्त्याच्या