पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(६)

घालवावयाचा त्यांना नापसंत होतें. माझे आजेसासरे त्या वेळी होते. त्यांनी आपल्या मताप्रमाणे हें केलें, म्हणून माझ्यामुळे त्यांच्यावरही सर्वोचा राग होता. " सासरी स्तोत्रपाठ, नामस्मरण इत्यादिकांची थट्टा होत असल्यामुळे. तीं म्हणण्याचे अर्थात् काशीताईंना सोडून द्यावें लागलें. बरें, उघडपणें शिक्षण चालू ठेवण्याचीही सोय नव्हती; पण असें असतांही काशीताईंना चोरून मारून तरी शिकणे प्राप्त झालें. या बाबतीत काशीताई लिहितात: किलें सवरले तरच मजसह संसार करणे शक्य आहे, नाहीं तर नाहीं, वोळतांना मी ऐकिलें, व तेव्हांपासून चोरून मारून कोणाकडून तरी जोडाक्षरें वगैरे समजावून घेऊं लागलें.”
 काशीताई माहेरी गेल्या म्हणजे त्यांना वर्ष वर्ष सासरी आणीत नसत. याचें कारण पतीची अप्रसन्नता व सासरच्या इतर माणसांची गैरमर्जी. अशा रीतीनें त्या माहेरी असल्या म्हणजे शिवलीलामृत, नवनीत, मराठी सहावें पुस्तक, व स्तोत्रें, ह्रीं वाचण्यांत त्या वेळ घालवित. त्यांचा भाऊ त्यांना स्नेह्यांकडून पुस्तकें आणून देई. याप्रमाणे काशीताईस वाचण्याचा नाद लागला. शिवलीलामृत व नवनीत यांची त्यांनी पारायणे केलीं. नवनीतांतील कठिण शब्दांवर टीपा असत, त्यांवरून त्या अर्थ लावीत.
 सासरी असतां चोरून लिहिण्यावाचण्याचा त्यांचा क्रम सुरू झाला. त्यांची शाळा म्हणजे कोठीची खोली व पाटावर निवडावयाला घेतलेले डाळतांदूळ हे त्यांचे सोबती ! कोठीच्या दाराला त्या आंतून कडी लावीत. मग थोडे वाचावें, थोडे निवडावें, असें चाले. अशा रीतीने कांहीं वाचन होई. एखाद्या वेळी वाचीत असतां मध्येच खोलीच्या दाराला कोणी धक्का दिल्याचा भास व्हावा व त्यामुळे काशीताईंच्या पोटांत एकदम धस्स व्हावें ! केव्हां केव्हां दाराच्या फटींतून, आंत काशीताई काय करीत आहेत, हे पाहाण्याचा कोणी प्रयत्न करीत; त्यामुळे काशीताईंना फार त्रास होई. एक दोन वेळां भातति खडे व वरणांत डोळ लागले; तेव्हां घरांतल्या बायांनी काशीताईंवर टीकास्त्राचा भडिमार केला !
 काशीताईचे पति गोविंदराव या वेळी मुंबईस अभ्यास करीत होते. त्यांचे वडील वासुदेव बापूची ऊर्फ दादासाहेब कानिटकर हे मुंबईस