पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसबाग

६१

दृष्टीस पडली कीं, त्यांच्या पोटांत धस्स होई. मथुरेचा तो गरीब, भिडस्त स्वभाव व त्यांच्या जोवयाची ती दिसून येणारी भावी स्थिति यांची ते आपल्या मनार्शी तुलना करून पाहत, तेव्हा आपण मथुरेस केवळ कष्टमय दरीत ढक- लून दिले असे त्यांना वाटे. अलीकडे हा विचार त्यांना सोडून एक क्षणभरद्दी पलीकडे होत नसे. विछान्यावर पडले तरी त्यांचा डोळा लागत नसे. सारा विचार ' माझ्या मथुरेचे कसे होईल' हा असे. त्यांस झोप लागेनाशी झाली. लोळून एखादे वेळ थोडी लागली तरी सारी स्वप्ने मथुरेच्या भयंकर स्थिती- चींच पडत. या विचारांनी ते अगदीं वेडावून गेल्यामुळे त्यांना अन्नपाणी गोड लागेनासें झालें, व रात्रीच्या रात्री झोंपेशिवाय जात. याच स्थितीत मथुराबाई वयांत आली. चालीरीतीचें देणेघेणें काय करावयाचें तें गोपाळनाइकांनी केलें. त्यानंतर लौकरच त्यांनी आपल्या सर्व मिळकतीची व्यवस्था केली. तिघी बाय. कांची त्यांच्या योग्यतेप्रमाणे व्यवस्था करून ठेवून बाकी जिनगीचा अर्धा वांट त्यांनी धर्मार्थ लिहून ठेविला व अर्ध्या वांटयाची मालकीण मथुराबाई झाली. ही व्यवस्था झाल्यावर पाच सहा महिन्यांच्या आंत गोपाळ नाईक परलोक वासी झाले.

 इकडे रघुनाथराव नित्य नवे नवे प्रकार करीत. रात्रंदिवस ते व त्यांची मित्रमंडळी ऐषआरामांत अगदी दंग होऊन राहात. इतके कीं, गोपाळनाईक 'स्वर्गस्थ झाल्याची बातमी सांगण्यास त्यांचा एक कारकून गेला होता, त्यास त्यांनी आपल्या ऐषआरामांत व्यत्यय आणल्याबद्दल चांगली पुष्पांजली वाहिली, आणि त्या कृत्याबद्दल त्या कारकुनास शिक्षा देण्याचा बहाणा करून ते त्यांच्या उत्तरकार्याला देखील गेले नाहींत ! शेवटीं त्यांचा एक लांबचा नातेवाईक होता त्यानेच ते उरकून टाकले.

 या सर्व प्रकाराबद्दल मथुरावाईस अत्यंत खेद झाला. पण तिने आपल्या मुखावाटे एक अक्षरही काढले नाही किंवा पतिसेवेत तिळप्राय अंतर पाडले नाहीं. त्यांची ( बाईची ) वागणूक नेहमीं सर्वोशी भारदस्तपणाची असे. सर्वोशी त्या गोड भाषण करीत. कामाशिवाय कोणापाशीं एक अक्षर बोलत. नसत. घरप्रपंचांत अगदीं दक्ष राहून फाजील उधळपट्टी अथवा कंजूषपणा त्या करीत नसत. योग्य ठिकाणी योग्य खर्च करीत. त्यामुळे घरांतल्या चाकर-