पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
चांदण्यांतील गप्पा

वामुळे आपल्या सावत्र आयांनाही ती अत्यंत प्रिय झाली होती. मथुराबाई साधा- रण सातआठ वर्षांची झान्यापासून बापाला व आईला तिच्या वरयोजनेची काळजी लागली. मुलीच्या गुणारूपाला योग्य नवरा कोठें आहे काय, याची ते आपल्या स्नेयासोबत्यांजवळ चौकशी करीत. गोपाळनाइकांचा ( मथुरादाईच्या वडिलांचे नांव ) एक सावकार स्नेही गोविंदा नाईक या नांवाचा होता. तोही अपत्यहीन होता. पण त्याचा दत्तक घेण्याचा विचार चालू होता. गोविंद नाईक यांचीही संपत्ति फार मोठी होती; परंतु त्यांस अपत्य नव्हते. त्यांनी दोन तीन लग्ने केलीं. दोघीतिघींनाही मुले झाली, पण जाग्यावर एकही राहिले नाहीं. गोविंद नाइकाचे आतां वयही साठीच्या पलीकडे गेलें होतें. तेव्हा कोणीतरी दत्तक घेऊन दौलतीला मालक करून ठेवावा व आपण काशीवास करावा, असा त्यांचा व त्यांची शेवटली जी पत्नी होती त्या पत्नीचा मानस होता. त्याप्रमाणे गोत्रजात त्यांनीं कशी करून एक मोठासा मुलगा दत्तक घेण्याचा निश्चय केला व गोपाळ नाइकांची मथुरा त्या मुलास योग्य वधू आहे असें पाहून दत्तविधान होतांच त्याचे लग्न करण्याचाही बेत केला. गोपाळ नाईकांसही आपल्या स्नेह्याच्याच घरीं मथुरा पडल्यास चांगले असे वाटत होते व त्या उभयतांच्या विचाराप्रमाणे गोष्टी घडूनही आल्या. मथुराबाईचें नांव गोविंद नाइकांनी जानकी ठेविले व आपल्या दत्तक मुलाचें नांव रघुनाथ ठेविलें. रघुनाथाला त्यांनी आपला धंदा शिकविण्यास सुर- वात केली; परंतु लग्न झाल्यावर वर्ष दीडवर्षाच्या आंतच गोविंद नाईक व त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी निजधामास गेलीं. त्यामुळे रघुनाथरावाचें शिक्षण पुढे झाले नाही. त्यांना चांगल्या प्रकारचें वळण लागले नाहीं. मूळ गरीब स्थिति होती, त्यांतून एकदम मोठ्या स्थितीत आले व एक दोन वर्षीच्या आंतच एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकी हातांत आली. त्याबरोबर हल कट मंडळीचा घोळका त्यांचेभोंवतीं जमला. गोपाळनाइकांनी जरी एखादी चांगली गोष्ट सां नाशी झाली. हलकट छिचोर मंडळीचा पगडा त्यांचेवर तरी ती त्यांना पुरा बसला. आपल्या एकुलत्या एक मुलीचे पुढील आयुष्य फारतें सुखांत जाणार नाहीं, हें गोपाळनाईकांना पुरे कळून चुकलें. हा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनांत येऊन त्यांना अत्यंत दुःख होई. मथुरा