पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
चांदण्यांतील गप्पा

नोकरांवर त्यांचा दाब असे. त्या गरीबगुरिबांचा समाचार घेऊन त्यांच्या अडचणी दूर करीत. प्रपंच संभाळून परमेराश्वराधनेंतही त्या वराच वेळ घालवीत; पण अगोदर पतिसेवा व नंतर परमेश्वरचिंतन, असा त्यांच्या मनाचा ग्रह झाला होता. रघुनाथरावांच्या भोंवताली आणखो नवी नवी चांडाळचौकडी जमूं लागली. नाटकें, तमाशे, नाच, बैठकी, मेजवान्या यांचा अगदी रंग उडून राहूं लागला. यामुळे व्यापाराकडे पाहाण्यास त्यांना एक पळाचीसुद्धा फुरसत नसे. पेढीवरचे मुनीम काय करतील ते करतील. वसूल आला किती, बाकी थकली किती, वगैरेकडे ते मुळींच पाहात नसत. घरांत आपली धर्मपत्नी अगदी एकटी अल्पवयी आहे, तर तिच्याशीं दोन शब्द बोलावे, तिच्या सहवासांत आठवड्यापैकीं कांहीं तास तरी घालवावे, अर्से कधींही त्यांच्या मनांत येत नसे. तिच्या भारदस्तपणामुळे त्यांच्या मनावर एवढा ताबा होता की, ते वेडेवेडेचार प्रत्यक्ष आपल्या ड्यांत मात्र करीत नसत. त्यांची ती चांडाळचौकडी जरी रात्रंदिवस त्यांच्या भोवती असे तरी त्यांच्या नादाने रघुनाथरावांनी आपल्या सुशील पत्नीचा कर्धी अपमान केला नाहीं, किंवा मुखावाटे अपशब्द उच्चारला नाहीं. मथुराबाई आपल्या यासंबंधाने आपल्याशीं अतिशय खेद मानीत; पण त्यांनी तो कधीं बाहेर दाखविला नाहीं. आपल्या आयांना या गोष्टीची ओळखसुद्धां दिली नाहीं. त्या असा विचार करीत कीं, ' आपल्या आया अगोदरच दुःखीकष्टी आहेत. आणखी माझ्यावद्दल कशाला मी त्यांना जास्त दुःख देऊं ? आता॑| सुखाची जी काय त्यांना आशा आहे ती मजपासूनच. ती मीच त्यांना दुःख देऊं लागले तर त्या विचाऱ्यांनी कोणाकडे पाहावे ? असा पोक्त विचार करून त्या आपल्या माहेरी गेल्या म्हणजे आनंदांत असत. खासरींसुद्धां चाकरमाणसांच्या देखत त्या कधीं दुर्मुखलेल्या नसत. रघुनाथ - रावांचें व आपले चारचार सहासहा महिन्यांत भाषण नाहीं असें त्या कोणा- सही भासूं देत नसत; परंतु, घरातल्या घरांत या गोष्टी कळल्याशिवाय कशा राहाव्या ? ते त्या हलकट लोकांना कळेच व त्यामुळे ते मथुराबाईचा क्षणोक्षणीं अपमान करीत. खरेंच आहे. ज्यानें सांभाळ करण्याबद्दल देव, अग्नि, ब्राह्मण यांस साक्षी ठेवून शपथ घेतली, तोच जर तिला विसरला, तर इतरांची कथा काय ? असा चाकरानोकरांकडून झालेला अपमान निमूटपणे सहन करण्याशिवाय