पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसबाग

५९

 कसेंबसें देवदर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलों. गणपतीच्या देवळांतच संध्या. काळ झाल्यामुळे पर्वतीस जाण्याचा बेत रहित केला व घरी जाण्यास निघालों.. माझ्या सोबत्याला मी एकदोन वेळ प्रश्न केला कीं, 'ही स्त्री कोणाची, या ठिकाण एकटी को राहते, व सौभाग्यवती असून अशी दुःखी कां, हे तुम्हांला काहीं माहीत आहे काय ?" त्यावर तो गृहस्थ म्हणाला: ' आपल्याला पुरी माहिती नाहीं; पण आतां आपण होडीवाल्यास तिची हकीकत विचारूं. मीं या स्त्री- बद्दल थोडीशी हकीकक ऐकली आहे. पण इत्थंभूत मला ती ठाऊक नाही. ती फार थोर कुळांतली आहे एवढे मात्र मला ऐकून ठाऊक आहे.

 असे वोलत बोलत आम्ही होडीजवळ येऊन पोहोंचलों. तो गणपतीचे पुजारीबोवा अंगरखा पागोटें घालून गांवांत जाण्यास निघाले होते ते होडत बसले, व आम्ही दोघांना त्यांनी बरोबर बोलाविलें. रोजच्या संवयीमुळे त्यांना होडी वल्हवण्यास येत होती, ते ती वल्हवूं लागले. होडीत बसल्यावर मी त्यांना त्या स्त्रीबद्दल हकीकत विचारली. त्यावरून त्यांनी इकीकत सांगतली ती अशी:-

 पुजारीबोवा म्हणाले, 'या बाईचें नांव मथुराबाई. त्याच्या बापाचें घर सदाशीवपेठेत आहे. त्याला तीन बायका झाल्या, पण मुलगा नाहीं. घरांत पैसा अगदी रगड. जोंधळ्या बाजरीच्या टिक्या भरून ठेवतात तशा यांच्या बापाच्या घरीं पैशाच्या ठिक्या लावीत, असे म्हणतात. यांचा केवढा मोठा वाडा आहे ! इतकी संपत्ति, आणखी पोर्टी मूल काय तें या एवढया मथुराबाईच. आणखी त्याही म्हातार-. पण तिसऱ्या बायकोला झालेल्या. यांचे लहानपर्णी अतिशय लाड करीत. एकुलती एक मुलगी असल्यामुळे बापानें तिला शिक्षणही मुलाप्रमाणेच दिले. मुलगी म्हणेल ती पूर्वदिशा. ती हट्ट घेईल तेवढा थोडा असे त्यांना वाटे. पण मुलगी भारी सालस.. तिनें कधीं हड घेतला नाहीं, कर्धी कोणची जिन्नस मागितली नाहीं कीं कांहीं नाहीं. शिकण्यासवरण्याची अतोनात आवड. आपले घडे ती फारच काळजीपूर्वक करी. त्याचप्रमाणे कशिदा, रांगोळ्या, गाणी, पक्वानें, स्वयंपाक इत्यादि सर्व कामांत आपण निपुण व्हावें अर्से तिला वाटे व त्यांतच ती आपला वेळ घालवी. यामुळे दांडगाई करणे, हट्ट करणे, किंवा विनाकारण कांही खेळणी विकत घेण्याचा नाद घेणें तिला ठाऊक नव्हते, वाहुल्य|शी खेळणे किंवा पोरी जमा करून सारा वेळ हुतुत घालणे, यांतले कांहींच तिला माहित नव्हते. आपल्या गोड स्वभा--