पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
चांदण्यांतील गप्पा
॥ १ ॥ भाग जिने दिये लिके फकीरी, तकिया और बिछौना

क्या रे ॥ २ ॥ कहत कमाल कधीरका वेटा ॥ सीस दिया फिर

रोना क्या रे ॥ ३ ॥


पद तिसरें. ( भैरवी.)


क्या भूला जग सारा ॥ हर हर क्या भूला जग सारा । न

माने झूठ पसारा ॥ धृ० ॥ काल भुजंग शरीर चवावे । मेंढा
चबावे मच्छी ॥ पल पल उम्मर टोटा होवे । विषय न होवे
न्यारा ॥ १ ॥ दीप देखके पतंग जैसा । घन कामिनीसे झोंवे ॥
मच्छी जैसी जलपर लोटे । प्राण गया सो प्यारा ॥ २ ॥ झोंबे
ग्यान नाहीं उस तनको मरते । तर ते क्या बुडावे ॥ न छोड नदीमो
घूसा। पीठ बांधकर पत्थर ॥ ३ ॥ अमृत छांडे विषको लेवे ।
सोई आत्महत्यारा ॥ परिस छांडके पत्थरा लेवे । कहते दास

कवीरा ॥ ४ ॥


 ही गाणी ऐकून आमची मनें फारच उदास झालीं व डोळ्यांतून एकसारखे अश्रु वाहूं लागले. त्या जागेवरून हालावॅसेंच वाटेना; पण घरी जाण्यास रात्र पडेल या भीतीने आम्ही उठलो व देवदर्शन घेण्यास देवळांत गेलो. तो तेथे प्रति- गंधर्वकन्या, अथवा कांदंबरीतील महाश्वेताच, सतार घेऊन गात बसली आहे असे वाटले. ती स्त्री तरुण, रूपसंपन्न असून अतिशय उदासवृत्ति धारण केलेली अशी होती. तिनें शुभ्रवस्त्र परिधान केलें होतें. केशांच्या अग्रांस मात्र एक गांठ मारली होती. ते लांब सडक केश ती बसली होती त्यामुळे. तिचे पाठीवरून खाली जमिनीवर लोळत होते. अंगावर एकही दागिना नव्हता. फक्त लहानशी नथ व हातांत एक आंगठी एवढे होतें. बसावयास एक मृगाजिन घेतले होते व देवाकडे तोंड करून ती सतारीवर पर्दे म्हणत होती. तिच्या डोळ्यांतून एकसारखे ओघळलेल्या मोत्यांच्या सराप्रमाणे अश्रु वाहत होते. गाल पुसून पुसून लाल झाले होते. ओंठावर रडण्यानें थोडा निळवटपणा आला होता व डोळे लालभडक झाले होते. शरीर अतिशय कृश झालें होतें. अशी ती करुणमूर्ति पाहतांच आमच्या अंतःकरणाचे पाणी पाणी झाले व तें डोळ्या- वाटे बाहेर पडूं लागलें.