पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसबाग

५७

नाहींसा होतो, त्याप्रमाणे ती त्या काळ्याभोर आभाळांत चमकली म्हणजे वाटे ! वाच्यामुळे तळ्याच्या पाण्यांत लाटा उत्पन्न होत होत्या, त्यांचीही एक मौज दिसत होती. तळ्याजवळ गेल्यावर मी माझ्या मित्रास म्हटलें: 'ही तळयांत लहानशी बाग दिसते आहे, तिकडे येतां का ?? तो गृहस्थ म्हणाला- 'हो हो, चला. पर्वतीचे देवळावरोवरच सारसबागेतले गणपतीचे देवालय बांधले व पर्वती संस्थानांतच सारसवागेचा समावेश होतो. हे स्थान पाहाण्यासारखे आहे.'

 आम्ही बागेकडे वळलो. तेथे गेल्यावर कडेला एक लहानशी होडी होती. तींत बसून आम्ही बागेकडे निघालों. जो जो जवळ जाऊं लागलों तो तो सतारी- वर कोणी गात आहे असे ऐकू येऊ लागले. सूर फारच गोड व सतारीवर हातही पण चांगला बसलेला असावा असे वाटलें.

 आम्हीं होडींतून उतरून पायऱ्या चढून वर गेलों व त्या देवळाजवळ पोहोंचलों मात्र, तो जसे त्या आवाजाने व त्या गाण्यानें जागच्या जागी खिळल्याप्रमाणे झालों. आवाज स्त्रीचा होता. मनांत असे आले की, देवदर्शनास आतांचा गेलो तर गाणें वंद पडेल. या भीतीने आम्ही देवळाबाहेरच गाणे ऐकत एका झाडखाली उभे राहिलों.

 ती स्त्री हिंदुस्थानी गाणी वरचेवर घोळून घोळून म्हणत होती. मी आपल्या खिशांतून एक पेन्सिल व एक कागदाचें चिटोरें काढून त्यावर ती उतरून घेतली. त्यांत वैराग्यरस ओतप्रोत भरला होता. तो गाणों अशीं:-

पद् पहिलें. ( देस. )


मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई ॥ धृ० ॥ मै तो आई

भक्त देख जक्त देखमोही ॥ माता पिता भाई बंधु संग नहीं
काई ॥ १ ॥ संतन संग बैठ बैठ, लोकलाज खोई ॥ अब तो बात
फैल गई जानत सच कोई ॥ २ ॥ जाके शिर मोर मुकुट, मेरे
पति सोई ॥ शंख चक्र गदा पद्म कंठ माल सोई ॥ ३ ॥ असुवन
जल सींचि सींचि प्रेम बेल बोई ॥ मीराकी लगन लगि होनी

होय सो होई ॥ ४ ॥


पद दुसरें. ( कालंगडा )


समझ ये मन खोज पियारे ॥ आशिक होकर सोना क्या रे
॥ धृ० ॥ सूखे रूखे मंगके टुकडे, बासी और सलोना क्या रे