पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गोष्ट चौथी.
"सारसबाग."


ज्यवयी गोष्ट सांगणारे गृहस्थ जनार्दनपंत म्हणाले:- देवाने दिलें तरी कमत असेल तरच त्याचा उपभोग मिळतो. अशाबद्दल मी एक प्रत्यक्ष पाहिलेली हकीकत सांगतों. कारण मला ती मनोरंजक गोष्टीसारखीच वाटते; आणखी तुम्ही ऐकल्याकर तुम्हालासुद्धां ती तशीच वाटेल.

 तुमच्यापैकी कोणी पुणे पाहिलेच असेल. दिवसाच्या गाडीनें गेलें, म्हणजे पुण्याच्या सभोवारचा देखावा मोठा मजेदार दिसतो. उंच उंच बंगले तांबड्या कौलांनी आच्छादलेली आपलीं डोकी हिरव्यागार दाट झाडींतून वर काडून जणूं काय सृष्टिशोभा पाहात आहेत ! तो नदीचा वाकडातिकडा फांटा पुण्यानग- रीचा कमरेचा कमरपट्टाच शोभतो आहे ! दूर नजर फेंकल्यावर चतुःशृंगीच्या टँकडीवर ते लहानसे पांढरें देऊळ. त्याच्या पलीकडे लांबपर्यंत मोठया सर्पासा- रखा पसरलेला तो कालवा व त्या सभोवतालचा तो वृक्षसमुदाय, यांचा देखावा मोठा नामी दिसतो; पण गाडीच्या वेगांत हा एकंदर देखावा दृष्टीपुढून भर्कन् नाहींसा होतो. डोंगरांच्या रांगा मात्र आळीपाळीने आपली डोक वर काढतांना दृष्टीस पडतात. भोंवतालच्या डोंगराचें तें वर्तुळ पाहिलें म्हणजे पुणे हे भुईकोट किल्लयांत वसले आहे, व सिंहगडाच्या दोन पाय-या दिसतात त्यांचा जणूं त्या कोटावर व त्याच्या बुरुजांवर चढण्यास जिनाच केला आहे की काय, असे वाटते. या सर्व देखाव्यांत पर्वतीची लहानशी टेकडी फारच नामी दिसते. पर्वतीकडे पाहिले असता असें मनांत येतें कीं, ही कोणी प्रचंड स्त्री पाय पसरून तटस्थपणाने आपली मैत्रीण जी पुण्यनगरी तिच्याकडे पाहत आहे, अथवा वेदांती म्हणतात त्याप्रमाणें - जीव व शिव यांसारखी, पर्वती व पुण्यन- नगरी या दोन पक्ष्यांची जोडी एका डहाळोवर बसली आहे. पुण्यनगरीरूप जीव विषयफळे भक्षून पुनः पुनः भवचक्रांत सांपडत आहे व पर्वतीरूप शिव तटस्थवृत्तीनें तो चमत्कार अवलोकन करीत आहे.

 -एका श्रावण्या सोमवारीं मी व माझा स्नेही पर्वतीला जावें म्हणून निघालों. त्या वेळीं पर्वतीच्या तळ्यांत पाणी होते. संध्याकाळची वेळ होती. तळ्याच्या