पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४
चांदण्यांतील गप्पा

ठिकाणीं परमेश्वरानेंच धाडिलें. मला रात्रंदिवस जी काळजी लागून राहिली होती, ती त्यानें दूर केली. आजपर्यंत मी चंपेचे कसेंतरी पालन केलें. आतां माझे. दिवस अगदी थोडे राहिले आहेत. माझ्यामार्गे माझ्या या अल्लड मुलीला या अफाट जगांत एकही माणूस मायेममतेचें उरणार नाहीं. मी तिला योग्य वराची योजना करून द्यावी हा माझा धर्म आहे. पण मला आतां त्या मनुष्यरूप राक्षसांचे दर्शन घेण्याचेसुद्धां भय वाटतें ! ही अशी सुंदर व अल्लड मुलगी त्या लवाड, दुराग्रही, लोभी, द्वेषांनीं भरलेल्या कुत्सित, आपमतलबी व दुष्ट अशा नीच शहरवासी लोकांना देणे म्हणजे आपणच आपल्या हाताने तिचा गळा कापण्या- सारखें आई ! तिला मी त्यांना अपल्या हातानें अर्पण करणे तर मला मोठे संकट वाटते. ही कल्पना मनांत आणली की, अंगावर कांटाच उभा राहातो ! असला विचार करूं लागलों म्हणजे माझे मलाच वाटतें कीं, मी कोणाच्या तरी खुनाचाच बेत करीत आहे. तेव्हां तुला माझ्या स्नेह्याच्या नातवाला- परमेश्वरानें जो येथें पाठविला तो माझे संकट दूर करण्याकरितांच पाठविला ! त्यानेच चंपेच्या वराची निवड केली ! तेव्हां ही माझी चंपा तूं वरलीस म्हणजे या ( देवाकडे बोट करून) पायापाशीं देह ठेवावा असा हेतु आहे. मी जातीचा ब्राह्मण व तुझ्या शाखेचाच आहे. दुष्टांच्या भीतीनें हा असा वेष ध्यावा लागला आहे व नांवे पालटावीं लागली आहेत. तेव्हां माझ्या चंपेचें पाणिग्रहण करण्यास कोणत्याही प्रकारची तुला आडकाठी नाहीं.

 ‘शिवाय तुम्हां दोघांचे एकमेकांवर प्रेम दुष्यंतशकुंतलेप्रमाणे जडले आहे, हेही माझ्या लक्षांत आले आहे. तेव्हां एकदां माझ्या देखत ही माझी जाईची वेल आम्रवृक्षावर चढली म्हणजे मी स्वस्थ होईन. पूर्वस्मरणाने माझ्या मनो- वृत्ति अगदी खवळल्या आहेत व त्याने मला अतिशय अशक्तपणा आला आहे. वारंवार डोळ्यांपुढे अंधेया येत आहेत. तेव्हां आतां एकदां लवकर हो म्हण,. म्हणजे मी स्वस्थ शेवटचे निद्रेचा अनुभव घेईन.'

 असे व आणखी कांहीं अस्पष्ट बडबडत म्हातान्यानें श्री दत्तमूर्तीपुढे जे डोकें टेंकलें तें उचललेच नाहीं !शेवटचेंच टॅकिलें !!

 म्हाताव्याची अंतकाळची इच्छा आमच्या अनंतरावाने मोठ्या आनंदाने शिरसामान्य केली, हे सांगण्याची मुळींच गरज नाहीं.