पान:चांदण्यातील गप्पा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

५३

विहिरीत उडी टाकून जीव दिला, असे खंडूजीनें मला सांगितले. दुष्टांनीं त्या माझ्या मुलाला मोट बांधून नेला तो एका अंधारकोठडींत नेला व त्याचे फार हालहाल केले. त्या असह्य वेदनांनीं त्याने हा लोक सोडून आपल्या आवडत्या पत्नीच्या मागोमाग प्रयाण केले. झाले. मुलगा, सून व संपत्ति अशा रीतीनें एका क्षणांत मला नाहींशी झाली. या वेळी ही पोर केवळ वर्ष दोडवर्षांची होती. तिचें संरक्षण करण्यास जगावे म्हणून माझा जीव घोंटाळला, व मागील सर्व सुख व त्याचे मागोमाग झालेले दुःख आठवण्यास परमेश्वराने मला जगविलें.

 'मग मी चंपीच्या अंगावर कांहीं थोडे दागिने होते ते मोडून गुप्त रितीनें -खंडूजीसह वेषांतर करून व नांव पालटून येथें आलो. अनंता ! पुत्रशोक फार वाईट आहे. त्याची नुसती कल्पनासुद्धां मला भयंकर वाटत होती. काशीयात्रेला जाण्याचेसुद्धां मीं मागें नाकारले. पण तोच मी ते दुःख सहन करीत आज पंधरा वर्षे जगलों आहे ! अरेरे त्या दुष्ट निर्दयांनी त्याला व तिला आपल्या या बालकाचें चंवनसुद्धां रे पोटभर घेऊं दिलें नाहीं ! अथवा मरणसमई ईश्वर- चिंतनासही वेळ दिला नाहीं !

 'हाय हाय ! काय मी दुर्दैवी ! असला चांगला सद्गुणी मुलगा व मिळालीं असून फार दिवस मला ती लाभलीं नाहींत. अनंता, मला आतां जास्त बोलवत नाहीं. माझें सर्व दुःख एकदम माझ्यासमोर येऊन उभे राहिले आहे. तो तो पाहा माझा मुलगा व सून एकमेकांचे हात धरून त्या दुष्टांचा सूड घेण्यास सांगत आहेत ! ती-ती पहा मला सूड उगवायाला सांगत आहे ! आणखी चंपेला सांभाळा म्हणताहेत ! चंपे ! चंपे !! ती बघ तुझी आई ! ती ती बघ. अगदीं 'अगदीं तुझ्याच सारखी - '

 असे कांहीं वेळ म्हातारा बडबडला. त्याची दृष्टीही कांहीं चमत्कारिक झाली व तो आपल्या खाटेवर निपचित पडला. खंडूजीनें पाणि आणिलें; अनंतरावांनीं त्यांना वाराविश घालून डोकीवर पाणी शिंपून सावध करण्याचा यत्न चालविला; व चंपा घाबरून रडूं लागली. तिला कांहींच समजेना. तिला आजपर्यंत आजोबांनी यापैकी कांहींच सांगितले नव्हते. आपण कोण, आपली स्थिति कशी होती व आतां -कशी झाली, हे तिला बिलकूल माहित नव्हते.

 कांही वेळाने सावध होऊन खोल गेलेल्या आवाजाने ते पुन्हां म्हणाले: अनंता ! तूं जोशांचा अनंत असे ऐकल्यापासून मला वाटत आहे कीं, तुला या