पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
चांदण्यांतील गप्पा

 ‘असो, परमेश्वराची इच्छा ! माझ्या हातून त्याचा तसाच कांहीं अपराध झाला असेल; तेव्हां त्याने मला ही जबर शिक्षा दिली. त्याच्या इच्छेनेंच हे सर्व जग चालले आहे, तेव्हां मी उगीच तळमळ कशाला करूं, असा विचार करून मी आज पंधरा वर्षे या अरण्यवासांत लोटलीं, व अझून आयुष्याचे जितके दिवस असतील तितके याच क्रमानें जातील. प्रसंगोपात्त पूर्वीचे स्मरण होऊन अंतःकरण कळवळतें.. दिलेल्या शिक्षेचा विसर पडूं नये म्हणूनच ही रात्रंदिवस टोंचणी असेल.

 'आतां मी एवढा वेळ विकारवश झाल्यामुळे, तुला मुख्यत्वें माझ्या प्रारब्धाची कथा सांगणार तें राहिलेच. तर ऐक. माझा मुलगा संपन्न असल्यामुळे बऱ्याच लोकांचें गांवांत त्याच्याशी नोकडें होतें. म्हणून लालखानास रक्कम न मिळाल्याचें कळतांच ते सर्व त्या दुष्ट देशमुखाला सामील झाले. एके रात्री, म्हणजे लालखां रकम मागावयास आला होता त्या दिवसापासून सरासरी तीन आठवड्यांनों, मध्यरात्रीच्या सुमारास माझ्या वाड्याला हत्यारबंद लोकांनी वेढा घातला. माझ्या वाड्यावरच्या पहारेकऱ्यांनी आपली शिकस्त केली व त्यापैकी एकदोघांना बन्याच जखमाही झाल्या. त्या दुष्टांनी माझ्या मुलाला तर वेदम मारिलें आणि त्याचे हातपाय बांधून मोट करून उचलून नेले. वाडयांत लुटालूट पुष्कळ केली, व सूनबाईच्या शौधार्थं तो दुष्ट नराधम दिवट्या घेऊन वाडाभर हिंडला. त्याचीं कृत्यें सर्व गांवास अगोदरपासून माहीत होतींच, तेव्हां आपणावर आतां कोणता प्रसंग येईल आणि कोणता नाही याचा काय नेम, असे म्हणून सूनबाई आपल्या पतीची झालेली दशा ऐकून या अर्भकाला अंथरुणावर निजलेले टाकून मागच्या दारानें कोणीकडे तरी निघून गेली. मी तिचा व या मुलीचा शोध करावयास लागलों. तिचा कोठें पत्ता लागेना. हॅ वालक मात्र स्वस्थ निद्रासुखाचा अनुभव घेत होते. त्यास उचललें व मीही मागच्या दाराने या खडूजीच्या साहाय्यानें त्याच्या घरीं गेलों. वाड्यांत त्यांनीं सारखा धुमाकूळ मांडला. आम्हांपैकी कोणीच सांपडेना म्हणून त्या दुष्ट दुरात्म्यांनीं शेवटी वाड्यालासुद्धां आग लावून दिली ! या हातांनी मिळविलेल्या संपत्तीची झालेली राखरांगोळीही याच डोळ्यांनी पाहाण्याचें नशिवीं आलें ! वाडा भडकतीच त्यांना वाटले, आता तरी सूनबाई व मी होरपळून बाहेर पडूं: पण ती त्यांची समजूत निष्फळ झाली. मी खंडूजीच्या घरांत गुप्तरीतीनें दोनचार दिवस काढले. सूनबाईने आमच्या मळ्यांतल्या