पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(५)


शिवाय त्यांना एक पंतोजीही शिकविण्याकरिता ठेविले होते. मुळे पंतोजी- जवळ शिकत असतां काशीताई दूर बसून काय होत असे व पंतोजी गेल्यावर पाटीवर धडे काढून धाकटा धाकट्या भावाची व त्यांची फार गट्टी असे. फावल्या वेळांत हीं दोघे शाळा- शाळा खेळत. त्यांत तो पंतोजी होई व काशीताईला विद्यार्थि बनवी. त्या वेळीं काशीताईचे थोडेसे शिक्षण होई. आईला शिकणेंसवरणें खपत नसे, म्हणून काशीताई खेळाचे निमित्त करून भावांकडे जात व त्यांच्यापाशीं घडे अक्षरओळख झाली. आतांच्या दहावें वर्षानें वेळी मराठी पुस्तकें वाचावयाला मिळत नसत; त्यामुळे काशीताईंचें या - बाबतींत पाऊल पुढे पडलें नाहीं. घोड्यावर बसणें, नेम मारणें, तलवारीचे हात फेंकणें, या गोष्टी काशीताईंच्या वडिलांना फार आवडत, व त्या त्यांनी आपल्या दोघा मुलांना शिकविल्याही. काशीताई अशा वेळीं जवळच असत. त्यांच्या वडिलांनी त्यांना घोड्यावर बसण्यास मात्र शिकविलें. वर्ष सुरू झाल्याबरोबर काशीताईंचे लग्न झाले. त्यानंतर एका त्यांची आई स्वर्गवासी झाली; त्यामुळे वरील तीन अल्पवयी भावंडे अगदीं उघडी पडली. काशीताईंचे वडील नोकरीसंबंधाने महिन्यांतून बरेच दिवस फिरतीवर असत. त्यांनी आपल्या घरांत एक घनपाठी वैदिक ब्राम्हण आश्रित म्हणून ठेविला होता. तो या मुलांचं सर्व प्रकारांनी संगोपन करी. तो अगदी जुन्या चालीचा असल्यामुळे त्याला मुलीनें लिहिलें सवरलेलें अगदीं खपत नसे. काशीताई पुस्तक घेऊन वाचताना त्याच्या दृष्टीस पडल्या की, त्यानें त्यांच्या डोक्यावर अशी जोरानें थप्पड मारावी कीं, त्यांच्या डोळ्यांपुढे घटकाभर काजवे चमकत राहावे ! या घनपाठी मारक्या ब्राम्ह णाची त्यांना साहजिक कार भीति वाटे; त्यामुळे माहेरी राहाण्याचा प्रसंग - आला तरी त्यांना मोकळेपणाने वाचावयाला सांपडत नसे.
 वडिलांचा नांवलौकिक, कुटुंबाचा कुलीनपणा, व मुलीचें टिप्पण या - तीन गोष्टी पाहून काशीताईंचें लग्न झालें. अलीकडच्यासारखें मुलगी पसंत करून ठरवायचे असें झालें नाहीं. यासंबंधानें काशीताई म्हणतात, " स्वरु- पाकडे काणाडोळा केल्यानें मी सासरच्या माणसांना व ज्यांच्याशी जन्म