पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

ल्याच जातभाईचा- दुसया एका निरपराध मनुष्यप्राण्याचा बळी द्यावा काय ? धिःकार असो त्या मनुष्यप्राण्याला ! त्याच्यापेक्षा या वनांतील पशु, ज्यांना आपण क्रूर म्हणतो, ते सहस्रपट - नाहीं लक्षपट चांगले. आज पंधरा वर्षे मी त्यांच्या सहवासांत आहे; परंतु त्यांनी आपला क्रूरपणा एक वेळही मला कधीं दाखव लेला नाहीं. उलट मनुष्यापेक्षां अतिशय ममतेने ते आमच्याशी वागतात, असेच मला वारंवार वाटतें.

 यासारखे आणखी पुष्कळ वेळ मानाजीराव बोलत होते. बोलत असतां त्यांना थकवा आला असे वाटून ते थोडा वेळ डोके टेकून स्तव्ध बसले. कांहीं वेळानें ते पुन्ही म्हणाले:-

 अनंता ! ऐक माझी गोष्ट असून संपली नाहीं. पण मागील सर्व गोष्टींची वण झाली म्हणजे मला देहमान नाहींसें होतें. निर्दय पशूत्रमाणे त्या लोकांना 'फाडून त्यांची आंतडी काढून छिन्नविछिन्न करावे, असेंही मला वाटते.

 सूड उगविण्याकरितां भारतीय युद्धांत दुःशासनाचें वक्षस्थळ विदारून ओमसेन रक्त प्याला असे आपण भारतांत वाचलें, म्हणजे त्याचे कृत्य आपणांस राक्षसी असे वाटते; परंतु माझ्या मनोवृत्ति खवळल्या म्हणजे मलाही तसेंच करा- वेसे वाटते. मग भीमासारख्या शूर वीराची गोष्ट पाहातां अपमान, राज्यभ्रष्टता, वनवास व अज्ञातवासांतलें दास्य, इत्यादि असंख्य कारणांनी त्याच्या मनोवृत्ति किती खवळल्या असतील याची माझ्या अनुभवानें मला चांगली कल्पना येते. माझ्या घरी कुणविणींच्यासुद्धां अंगावर दोनदोन शेर सोनें होतें. सोन्या रुप्याच्या भांड्यांशिवाय आम्हीं खातपित नव्हतों. गुडध्याइतक्या उंच मश्रूच्या विछान्या. शिवाय आम्हांस आडवें होण्याचें ठाऊक नव्हते; पण आता माझ्या एकुलत्या एक चंपेला आपली दागिन्यांची हौस पूर्ण करायाला रानातली फुले गोळा करावी लाग तात ! मातीचें भांडे आमच्या दृष्टीससुद्धां पडत नसे, पण येथें माझ्या चंपेला मातीची घागर डोकॉवर घेऊन पाणी आणावें लागतें ! एखाद्या मजुरासारखा मी या जमिनींत खपून पोट भरितों ! त्या वेळी माझ्या मनाची काय स्थिति होत असेल त्याची वावा, तूंच कल्पना कर. माझो चंपा या कातडयावर निजलेली पाहून माझे डोळे पाण्यानें भरून येतात.