पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
चांदण्यांतील गप्पा

वाईट वाटण्यासारखे झाले नाहीं, अथवा या गृहस्थाला मत्सर, द्वेष व पाप- वासना शिवल्या असतील असे कोणाच्याही मनांत आले नाहीं. व्यापार करूं लागले म्हणजे अशा गोष्टी वारंवार घडतात. त्यात कांहीं आम्हाला विशेष वाटले नाहीं; परंतु गांवांत आपण एक प्रबल वैरी करून घेतला असे माझ्या मुलाला मात्र पक्के वाटून चुकले.

 'कोणाचीही सुस्थिति किंवा भरभराट असलेली लोकांना पाहावत नाहीं. माझे वैभव गांवच्या पुष्कळ लोकांच्या डोळ्यांत खुपत होतेच. माझ्या व माझ्या मुलाच्या वाईटावर पुष्कळ लोक होते. माझ्या सुनेच्या सुशील वर्तनाबद्दल देखील त्यांना बरें वाटत नसे. आपल्या आंगी सुशीलता अथवा सद्गुण नसला व तो शेजाऱ्याच्या अंगी असला म्हणजे त्याची विनाकारण निंदा करून काल्प- निक दुर्गुण त्याचे ठिकाणीं स्थापित करावयाचे हा मनुष्यस्वभावच आहे. आप- ल्यापेक्षां तो चांगला असे म्हटलेले त्याला खपत नाहीं. या सृष्टिनियमाला अनुस रूनच मला, माझ्या मुलाला व सुनेला गांवांत शत्रु पुष्कळ होते. तसे मित्रही होते; परंतु दुष्टांच्या संख्येच्या मानाने सुष्टांची संख्या या जगांत थोडो असते. त्याच मानाने मला मित्रही थोडे होते. अनंता ! तुझा आजोबा एक माझ्या जिवलग स्नेयांपैकीच होता. पण मजवर जेव्हां प्रसंग गुदरला तेव्हा तुझा आजोबा सर्व कुटुंबासुद्धां महायात्रेस गेला होता. तो मलाही बरोबर येण्यासाठीं फार आग्रही करीत होता, पण मला माझा एकुलता एक मुलगा सोडून जाववेना. मला त्याच्यावांचून एक दिवसही चैन पडत नसे. तो कुठें गांवाला जातो म्हणाला तर मी त्याला जाऊं दिलें नाहीं. परंतु तोच मी आज पंधरा वर्षे मुलाशिवाय जगलों आहे! मी आधीं जायाचा तों तींच माझ्या आर्धी गेलीं व माझ्या गळ्यांत हा मोहपाश घातला ! त्या दुर्धर प्रतंगीं मला कोणीही सहाय्यक नव्हते. हे मनुष्यरूपी राक्षस निव्वळ सोन्यास व आपल्या पशुतुल्य मनोविका- रांस वश झाल्यामुळे, बावा, मी आपल्या मुलाला, सुनेला व घरादाराला अंत- रलों. त्या मानवरूपी हिंस्र पशूंनी आपल्या तीक्ष्ण नखांनीं जो माझा अंतःकरणाचा लचका तोडून व्रण केला तो कोणत्याही या मृत्युलोकच्या धन्वंताकडून वरा होणें नाहीं. जो मनुष्यप्राणी अगदीं शहाणपणाच्या शिखरावर पोंचलेला, त्यानें यःकश्चित् मृत्तिकेसमान अशा सोन्याला व पशुतुल्य आपल्या मनोवृत्तीला आप-