पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८

चांदण्यांतील गप्पा  पाहुणा गृहस्थ जेवून आला आणि त्यानें पूर्ववत् मानाजीरावांच्या खाटशी बैठक मारली. कांहीं वेळ स्तव्ध बसल्यावर तो हात जोडून मानाजीरावांना म्हणालाः – “ महाराज, मी आपणास एक प्रश्न करणार आहे. उत्तर मिळण्यास अडचण नसेल तर विचारतों. " त्यावर मानाजीरावांनी अनुकूल मत प्रदर्शित केल्यावरून पाहुणे गृहस्थाने मोठ्या नम्रवणानें प्रश्न विचारला.

 पाहुणा - प्रश्न कांहीं फार महत्त्वाचा आहे असे नाहीं; परंतु येथें आल्यापासून माझी जिज्ञासा मला चैन पडूं देईना, व ती मला रात्रीं स्वस्थं झोंप पण घेऊं देणार नाहीं, एवढ्याकरितांच विचारतों. आपणांस मी आमची हकीकत सांगत असतां आपण केलेल्या प्रश्नावरून माझ्या घरादाराची व आप्त इष्टांची आपणास पूर्ण माहिती आहेसे दिसलें. आपण एका काळी आमच्या प्रांती राहाणारे होतां असें वाटतें. तेव्हा आपलं मूळ राहण्याचे ठिकाण कोणतें व या निर्जन पर्वतावर हिं पशूंच्या सन्निध राहावयाचें आपणांस कारण काय पडकें हें जाणण्याची इच्छा आहे.

 मानाजीराव आपल्या खाटेवर उठून बसले व म्हणाले; 'बाबा ' मी आतां तेच सांगणार होतों. तूं जरी विचारले नसतेंस तरी मी होऊन तें तुला सांगणा रव होतो.

 अनंता ! तुझा बाप कृष्णाजीपंत आणखी मी दोघे बाळमित्र. आम्ही दोघेही चंद्रपुरांत राहाणारे. तुमचें घर खालच्या आळीला आहे व माझें - पण माझें कसले ? हा देह जेथें कांहीं काळपर्यंत राहात असे ते घर खालच्या आळीला होते. तुझा बाप कृष्णाजीपंत'- अनंतराव मध्येच म्हणाले, ' कृष्णाजीपंत माझा आजा.' त्यावर मानाजीराव म्हणाले- 'आजा नाही का ? हो, आजाच, तो व मी नेहमीं सुखासमाधानाच्या गोष्टी बोलत चालत नेहमी आनंदानें वेळ घालवीत असूं. या देहाला एकच मुलगा व एकच सून होती. मुलगा चांगला कर्तासवरता झाला होता. पेढीचे काम सर्व तोच पाही. चार लोकांत त्याला मान असे. कोणतीही गोष्ट अंगावर घेऊन पुढे होऊन तो करीत असे. गांवच्या आबालवृद्धांना तो मोठा प्रिय झाला होता.

 'घरचा व्यागारबिपार सर्स त्याने आंवरल्यामुळे मला कांहीं एक काळजी नव्हती. मी स्वस्थ हरि हरि म्हणत व आपल्या एकुलत्या एक मुलाच्या कतृ- त्वाचे कौतुक करीत सुखांत काळ घालवीत होतों. सूनबाईंही मोठी चांगली,