पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

 "हल्लीं मीं आपणांस विशेष कांहीं सांगू शकत नाहीं. पण गोब्राह्मण प्रतिपालक करणारांचा मी एक कैवारी आहे. आम्ही कांहीं मंडळी सैन्यासह असे फिरत असतो. संध्याकाळी मी असा एकटाच या डोंगराचा शोध करावा, हा कसा आहे काय आहे हे पाहावें, या इराद्यानें बि-हाडांतून निघालों. डोंगराचा वनश्री पाहात पाहात वर आलों, तो मला संध्याकाळ झाली. वर आल्यावर कोणी गोड असे गातें आहे असा मला भास झाला. कोण म्हणून बघू लागलों तर टांक्यावर खरोखरच वनदेवता गात होती. तिची प्रार्थना करून, महाराज, या ठिकाणीं आलों, तो आपले दर्शन झाले. माझे नांव अनंत व राहाण्याचे ठिकाण चंद्रपूर.

 अशी अक्षरें त्याच्या तोंडांतून निघतांच मानाजीराव एकसारखे त्याच्या डोळ्यांकडे व चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्यांना कांहीं खुणा पटल्याशा वाटल्या व ते एकदम म्हणाले :- दत्ताजीपंत जोशांचे आपण कोणी संबंधी आदां काय ?

गृहस्थ- होय, महाराज.

मानाजी०- हां ! दत्ताजीपंत कोठे आहेत ?

गृहस्थ- मी लहान असतांच वारले.

मानजी०- त्यांचे कुटुंब ?

गृहस्थ-( आपल्या छातीकडे बोट करून ) त्या कुटुंबापैकीं हा एकटाच प्राणी

जगांत उरला आहे, त्याला दुसरे कोणी नाहीं.

मानाजी०- अरेरे ! फार वाईट झालें ! बरें आपणास कांहीं कुटुंबविटुंव ?

गृहस्थ- तेही कांहीं नाहीं

.

 त्या तरुण गृहस्थाला नवल वाटले की, अशा एकांत स्थळी राहाणाच्या या गृहस्थाला चंद्रपुरची व आपली माहिती कशी ?

 वर प्रमाणे त्यांचे बोलणे होत आहे तो चंपी जेवायाचे झाले म्हणून सांगायाला आली. त्यावरून खंडजी व पाहुणा गृहस्थ दोघेही उठले. मानजी- रावाला चंपेनें तेथेंच पानगी आणून दिली, ती त्यांनी खाल्ली. त्यांचे जेवणखाण झाल्यावर नित्याच्या परिपाठाप्रमाणे चंपा आपल्या आजोबाच्या पायोशी जाऊन बसली. बाहेरच्या बाजूला खंडूजीने त्या गृहस्थास एकवार एक अशीं दोन वाघाची कातडी अंथरून दिलों व एक घोंगडी पांघरण्यास ठेविली. त्याच्याजवळच खंडूजीने आपलेही अंथरुण पसरलें.