पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
चांदण्यांतील गप्पा

येतांना त्याला दिसली. खंडूजीला पाहताच चंपा थोडी स्वस्थ झाली. खोपटाच्याजवळ येतांच मानाजीरावांना आनंद झाला. परंतु तिच्यामागून येणाऱ्या गृहस्थाकडे पाहतांच त्यांचे पोटांत धस्स झार्के. चंपेकरितां सर्वस्वाचा त्याग करून त्या एकटचा जीवाकरितां अरण्यवास पत्करला. तेथेंही आणखी कोणाचें अरिष्ट ओढवतें कोण जाणे, अशी त्यांना धास्ती पडली. हा आलेला कोणी मुसंडा आहे, की बादशहाचे एखादें पाळीव कुत्रे आहे, की एखादा मराठा आहे, किंवा आपल्याचसारखा एखादा आपल्या स्थितीला कंटाळून अरण्यवास पत्करण्यास आला आहे- अशा नाना कल्पना यांच्या मनांत येत होत्या. शेवटीं तो गृहस्थ खोपटाशीं आला, व त्यानें नम्रपणाने मानाजीरावाला मुजरा केला व एक रात्र आश्रय देण्याबद्दल विनंती केलो. मानाजीरावांनीं होय नाहीं करीत ती शेवटीं मान्य केली. ते खुरडत खुरडत आपल्या खाटेवर जाऊन पडले. तो गृहस्थही त्यांच्या मागोमाग खाटेजवळ एका वाघाच्या कातड्यावर वीरासन घालून बसला. चंपा स्वयंपाकास लागली व खंडूजी धन्याचे पाय चेपीत वसला.

 स्वयंपाक करीत असतां चंपेच्या मनांत त्या गृहस्थाबद्दल विचार घोळू लागले. ‘तो कोण वरें असेल ? आजोबा ज्या मुसलमानांना नेहमी शिव्या देतात त्यापैकी तर तो नसेल ? तोच असला तर तो दिसण्यांत एवडा चांगला कसा ? त्याच्या वाणीत इतका मधुरपणा कोठून आला ? त्याच्या डोळयांत क्रूरपणा कसा दिसत नाहीं ? किंवा, खरोखरच तो एखादा भला गृहस्थ असेल ? पण तो जातीचा कोण वरं असेल ? माझ्या मनात त्याला पाहिल्यापासून काय बरें असें होतें आहे ? ' अशासारखे विचार एकसारखे चालले होते. त्या विचारांनी विचारी भांबवून स्वयंपाक करण्यांतसुद्धा घोंटाळली. भाजीत मीठ घालण्यास विसरली, आजोबाची पानगी गूळ घातल्याशिवाय केली, व भाताची पेज काढावयाची राहिली; असा तिचा घोंटाळा झाला. तो गृहस्थ काय बोलतो आहे हे ऐकण्याच्या उत्सुकतेनें] ती शेंकडो वेळा दारांतून डोकावून गेली, व अशा रीतीने वेळ मोडल्यानें स्वयंपाकही लवकर झाला नाहीं.

 इकडे मानाजीरावांनी त्या गृहस्थास-तुम्ही आलांत कोठून, जातां कोणीकडे, नांव गांव काय, - वगैरे गोष्टी विचारल्या. त्यावर तो म्हणाला:-