पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ee મ્ર चांदण्यांतील गप्पा पद. [ राग-ललत. ] रमारंग - हृदयसंग घडावें अजि गडे, बडविं अजि गडे ॥ ध ● ॥ चंद्र - चंद्रिकाप्रकाश मलय-मस्त सावकाश ॥ शीत मंद, कुसुमगंध, वृक्षवृद चहुंहिकडे, चहुंहिकडे ॥ रमा० ॥ १ मित्र-कन्यका - सुनीर मृदुल सैकतेयतीर । कोक - कोकिलासु कूजितैक कलकलाट - पडे-लाट पडे० ॥ रमा ॥ २ रम्य समय हा वसंत येती तीर्थार्थ संत ॥ त्यांत पावतां अनंत विठ्ठलासि लाभ घडे, लाभ घडे० ॥ रमा० ३ अगोदर ती संध्याकाळची वेळ, तशांत ती ज्या टांक्यावर पाणी भरण्यास गेली होती तें खाली खोल होतें; त्यामुळे तिचा तो अत्यंत गोड आवाज फारच खुलला होता, व तिचेंही पण गाण्यांत लक्ष लागून गेलें होतें. वरील पद्य ती अतिशय साध्या चालीत घोळून घोळून म्हणत होती. तें सुस्वर गाणे त्या दरीमध्ये सारखें भरून राहिले होते व सुराचा भरणा होण्याकरितां तंबुरा अथवा दुसरें एखायें वाद्य जसें गाणाराची साथ करतें, त्याप्रमाणें ती दरी प्रतिध्वनीने तिला साथ करीत होती! त्यामुळे लांब अंतरावर एखाद्या भव्य दिवाणखान्यांत गायन चालले आहे, असा भास होई. चंपी “ रमारंग-हृदयसंग घडविं अजि गडे । घडविं अजि गडे । " हें पालुपद कितीतरी प्रेमळपणानें व पुनः पुनः म्हणत होती. त्या गाण्यांत तिची तीच रंगून गेली होती. मध्यंतरी तिला कोणाची चाहूल झाल्याचा भास झाला, म्हणून तिनें पुढे मागें, बाजूला वळून पाहिले; पण तिच्या कोणी दृष्टीला पडलें नाहीं. तिची घागरही आतां भरत आली होती. ती खालच्या चिखलट पाण्यांत पडेल म्हणून तिला हात देऊन तिनें पुनः आपलें गाणें म्हणण्यास आरंभ केला. यावेळी चंद्र नुकताच वर येऊं लागल्यामुळे पूर्वेकडचा भाग सोनेरी रंगाचा दिसत होता. झाडांच्या सांवल्या अस्पष्ट दिसत होत्या. कारण, पश्चिमेकडील संधिप्रकाश असून चांगलासा नाहींसा झाला नव्हता, व पूर्वेकडून चंद्र प्रकाश- ल्यामुळे सांवल्यांना असून स्थळच मिळाले नव्हतें. अशा समयी चंपाबाईच्या गाण्याच्या ऐन रंगांत एक तरुण देखणा पुरुष हत्यारबंद असा एकाएकीं पुढें