पान:चांदण्यातील गप्पा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

४३

परक्याचे घरी राबावयाला जावयाचें, तेव्हां वाईट कां वाटणार नाहीं ? राज- कन्या असो वा रंककाम्या असो, पितृगृह सोडतांना वाटणारे दुःख दोघींनाही सारखेच. बायकांचे अंतःकरण बायकांनाच ठाऊक, व त्यांनाच मुलीच्या मनाची स्थिति जास्त ठाऊक. म्हणूनच की काय, दन्यारूप स्त्रिया नदीला पोटाशी कव टाळून धरीत व कडेरूपी निर्दय पुरुष मोठचा निष्ठुरतेने तिला शाकुंतल नाट- कांतील शारंगकाप्रमाणे “ हां, चल लवकर - उशीर झाला. पुरे आतां" असे म्हणूनच तिला फरफरां ओढीत !

 अशी त्या सुंदर गिरीशिखरावर मानाजीराव राहात असतां बरीच वर्षे लोटली. त्यांची चंपा आतां चांगली मोठी झाली; व तिच्या काळजीनें व अंशतः वृद्धाप काळामुळे मानाजीराव दिवसेंदिवस थकत चालले, हें वर सांगितलेच आहे. चंपा आतां घरांतील केरवारा स्वयंपाकपाणी वगैरे सर्व करी. घरांतील काम आटपलें कीं, ती आपल्या आजोबाच्या खाटेवर येऊन त्यांच्या पायगती पडे. आजोबा फार थकल्यामुळे देवळांतच खाट टाकून देवासमोर अक्षयीं ईश्वर- चिंतन करीत पडत. एक दिवस दोनप्रहरचें काम आटोपल्यावर नित्याप्रमाणे ती आजोबांचे पायांपाशी पडली असतां ती जी झोंपेच्या आधीन झाली ती सध्य- काळी अस्तमानाच्या सुमारास जागी झाली. त्याबरोबर ती खडबडून उठली व आपली मातीची घागर व चुंबळ घेऊन पाण्याच्या टांक्याकडे चालूं लागली. मानाजीरावांच्या झोपडीपासून टांकें बरेंच दूर होतें. सूर्य अगदी खालीं गेला होता. पक्षी आपल्या घरटर्थात जाऊन बसल्यामुळे जिकडे तिकडे सामसूम झाले होतें. कोठें वायनें झाडें हेलकावत व जमिनीवरील वाळलेला पाते। एक ठिकाणी गोळा होऊन चक्राकार उडे, त्याचा मात्र आवाज होई. एवढीच कायती हालचाल, वाकी जिकडे तिकडे शांत होतें. अशा वेळी चंपा एकटी टांक्यावर गेली. तेथे वरून जो झरा वाहात होता त्याला तिनें जवळच्या एका ओव्याच्या झाडाचे एक पान घेऊन, ते झऱ्याच्या अंमळ खाली खडकाच्या फर्टीत लावून त्या पानाच्या खाली भापली घागर घरली; व टिप् टिप् गळ- णाऱ्या पाण्याने घागर केन्द्रा भरते याची वाट पहात त्या पाण्याकडे दृष्टि लावून आजोबांनी शिकविलेल्या गाण्यांतील कवि विलकृत एक सुंदर व सुस्वर गाणे म्हणूं लागली. ते गाणे येणेप्रमाणे :-