पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
चांदण्यांतील गप्पा

 ठिकठिकाणीं पाउलवाटांनी तांबुस, पिंवटळ व पांढरी अशो नागमोड पसरलेली होती. अशा पाउलवाटा असंख्य होत्या. त्या पाहून जणूं काय नागनागिणी व त्यांची पिलें पर्वतरूप शंकराचे अंगावर खेळत आहेत असे वाटे. ठिकठिकाण दृष्टिगोचर होणारे नदीच्या पाण्याचे पाट हे जणूं त्यांच्या जटेंतून भागिरथी चेच प्रवाह निघाल्याप्रमाणे भासत. तिचा प्रवाह खालीं चालला होता त्यामुळे असे वाटे की, एखादी लाडकी माहेरवाशीण सासरी जातांना जशी खिन्न वदन, अश्रुपरित नेत्रांनीं मातापित्याचें घर सोडते, व जोपर्यंत माहेरची माणसें तें घर निदान तो गाँव दिसत असतो तोपर्यंत मागे वळून पुनः पुनः पाहात असते, त्याप्रमाणे ती जणूं पित्रगृहाकडे वारंवार वळून पाहात आहे क खिन्नवदन करून मार्ग क्रमीत आहे !

 पर्वतराजाची ती कन्या, तेव्हां तिच्या गमनसमय सर्व आश्रित आपापल्या- परीने तिची सेवा करून निरोप घेत आहेत. तिला उन्हाची वाधा होऊं नये म्हणून वृक्षवेलींनी आपल्या हद्दीत आपल्या शरीराचे मांडव करून तिचा रस्ता शीतळ केला. निरनिराळ्या पुष्पवेलींनीं तो मार्ग सर्व सुवासित करून सोडला. वान्यानें मंद वाहून तिचा चालण्याचा श्रमपरिहार करण्याचे व वाटेंतली धूळ झाडून टाकण्याचे पत्करिलें. ठिकठिकाणच्या दऱ्याखो-यांनीं नदीरूप राजकन्येला जागोजाग विश्रांति घेण्यास विरामस्थळे तयार करून ठेविलीं. ज्यांना तिच्या गमनपथापर्यंत येण्याचें साधन नाहीं अशा वृक्षांनी आपली सुंदर सुंदर फुले व फळे तिला अर्पण करण्यास वायूच्या हाती पाठवून दिलीं, व तिजबद्दल व तिचे पित्याबद्दल आपली स्वामिभक्ति व्यक्त करून दाखविली. मौनव्रत धारण करणाऱ्या मोठमोठ्या वृद्ध वटवृक्षांनी " मुली, तुला पतिगृही सुखसंपत्ति प्राप्त होवो, " असा आशीर्वाद देण्याच्या हेतूने डोकी हालविली. करंजासारख्या अत्यंत व्यवहारकुशल स्त्रियांनी आपल्या फुलांनी तांदळासारखी तिची ओटी भरून तिचे कपाळास अक्षता चिकटविल्या. वनचरांनी तिच्या पायांचें बन घेऊन आपली राजनिष्ठा व्यक्त केली. अशा थाटानें जरी ती गिरिकन्या आपल्या पतिगृही जात होती तरी तिचें अंतःकरण खिन्न झालेले होतें. खरेंच आहे. ज्या घरांत मातापितरांच्या अकृतिम प्रेमळ सहवासांत, बंधुभगिनींच्या सुखानंदांत दिवस गेले, तेंच आतो एकदम सर्व मायाममता गुंडाळून अगदीं