पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४ ) पुरुष करूं पाहाणारें व पुरुषांना स्त्रिया बनविणारे शिक्षण राष्ट्राला अधोगतीला नेणारे आहे. याविषयीं येथें अधिक लिहितां येत नाहीं. वर निर्दिष्ट केलेल्या शिक्षणाच्या पहिल्या अवस्थेत ज्या दोन कुलस्त्रिया महाराष्ट्रांत उदय पावल्या त्या श्रीमति काशीताई कानिटकर व श्रीमति रमाबाई रानडे या होत. या दोघीही शिकण्याकरितां कोणत्याही शाळेत गेलेल्या नाहीत. सर्वथैव प्रतिकूल परिस्थितीत त्या लिहिणेवाचर्णे शिकल्या व स्वतःच्याच परिश्रमानें व दृढनिश्चयाने कर्तत्ववान् झाल्या. काशी- चार पु शि. १८६१ साली बापट आडनांवाच्या सुप्रसिद्ध जुन्या वळणाच्या घराण्यात जन्मल्या. यांच्या वडिलांचे नांव कृष्णराव ऊर्फ अण्णासाहेब असें होतें. हे मोठे कर्मठ, स्नानसंध्याशील, किंबहुना तपस्वी होते, असें म्हटलें तरी अत्युक्ति होणार नाहीं. यांच्या थोरल्या मुलींची लग्ने होऊन त्या सासरी गेल्या होत्या. घरांत त्यांची पत्नी व तीन लहान मुलें होती. त्यांत काशीताई वडील व दुसरे दोन लहान भाऊ होते. ह्रीं तीन भावंडे एके ठिकाणी बरोबर वाढली. यांना पहांटे उठण्याचे वळण लागलें होतें. त्या वेळी व संध्याकाळीही अण्णासाहेबांनी व केव्हां केव्हां त्यांच्या उपाध्येबोवांनी या मुलांना स्तोत्रें, नामपाठ व देवांची गाणीं शिकवावी; त्यामुळे या भावंडांच्या बाणीला उत्तम संस्कार झाला. अण्णासाहेब दुपारी बारापासून दोनपर्यंत घरी असत. त्या वेळीं ते आपल्या धाकटया दोन मुलांना रामायणाची मोडी बखर वाचावयास शिकवीत. तेव्हां ते काशीताईंनाही ' जवळ येऊन वाचावयाला बैस ' म्हणत; पण काशीताईंच्या आईला ही गोष्ट अगदीं पसंत नसे, ही गोष्ट काशीताईला ठाऊक होती; यामुळे वडिलांजवळ बसून वाचाव- याला शिकण्याला त्यांना धीर होत नसे. काशीताईंना मुलांबरोबर शाळेत पाठवावें असें अण्णासाहेबांना पुष्कळ वेळां वाटे; पण त्यांची आई या विचा- राला नेहमीं आडवी येई. ती म्हणे, 'कांहीं नको मुलांच्या शाळेत जाऊन दांडगी व्हायाला ! बायकांना एवढे शिक्षण हवे कशाला ?' काशीताई आपल्या आईच्या मनाचा कल पाहून वागत. त्यांचे धाकटे भाऊ शाळेत जात. सकाळी सात ते नऊ व दुपारी दोन ते चार अशी त्यांची शाळा असे.