पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
चांदण्यांतील गप्पा

बारीक, सारखे आणि शुभ्र, केश लांब सडक, भांग बारीक, भिवया कमानदार, कपाळ विस्तीर्ण, असे होते. एखाद्यानें जर तिला त्या एकंदर परिस्थितींत पाहिली असती, तर त्यास ही कण्वकन्या शकुंतलाच की काय, असे वाटल्यावाचून राहिले नसतें व मानाजीराव हे कण्वाच्या जागी शोभले असते. फक्त तेथे तपश्चर्येला अवश्य अशा साधनांनी भरलेली पर्णकुटिका उपजीविकेच्या व स्वसंरक्षणाच्या सांधनांनींही भरलेली होती.

 खंडूजी मध्यम वयाचा असून त्याचें शरीर कसलेले होते. तो दिसण्यांत मोठा धूर्त, चपल व स्वाभिकार्यदक्ष असे. हीं तीनच काय ती त्या लहानशा कुटुंवाचीं माणसें.

 मानाजीरावांची चंपा कधीं कधीं कुसरीच्या जाळीजवळ आपले घरकुल करून आपल्याशींच खेळत बसे, तेव्हां तर ती खरोखर वनदेवताच वाटे ! तिनें कधीं कुसरीचीं पुष्कळ फुले गोळा करून त्यांचे हार गुंफून अंगणांतल्या देवाला घालावे, कधीं गुंजा गोळा करून सुरेख सुरेख खेळणी करीत एखाद्या आंब्याच्या वृक्षाखालीं बसावें, कधीं मेंदीचे तुरे आपल्या केसांत व कानांत घालावे, कधीं बाकाळींचीं लालभडक फुले तोडून कानांतल्या माणकांच्या कुड्यांची आपली हौस पुरवून घ्यावी. अशा तऱ्हेनें तो आपला सर्व वेळ त्या निर्जन अरण्यांत वनस्पतींना व हरणांना सौंगडी करून त्यांच्या संगतीत घालवी. खेळत असतां आजोबा कोठे आहेत इकडे तिचे लक्ष असे. एखादे वेळ ते जर चटकन् दिसले नाहीत तर ती एखाद्या घावरलेल्या हरणाच्या पाडसाप्रमाणें कावरीबावरी होऊन बघे व उडया टाकीत आजोबांजवळ जाई; व त्यांचे अंगाकर लोळण घेई तेव्हां तिचें समाधान होई.

 याप्रमाणे त्या लहान कुटुंबाचे दिवस आनंदांत जात. चंपा दिवसेंदिवस जसजशी मोठी होत चालली, तसतसा मानाजीरावांस जास्त जास्त उदासीनपणा येत चालला, व ते अतिशय थकत चालले. डोळ्यांनी चांगलेंसें दिसेना, चाल- तांना झोंके जाऊं लागळे, व आजची शक्ति उद्यां नाहीं असें होत चाललें.

 चंपा जरी वयाने मोठी होत गेली तरी तिच्यांतला बालभाव कमी झाला नाहीं. आपले आजोबा आपल्याच काळजीने जास्त खंगत चालले आहेत, हे तिच्या ध्यानांत आले नाही. आजोबा आता झोपडीच्या बाहेर चार चार दिवस पडत