पान:चांदण्यातील गप्पा.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वनवास

३९

आला तर त्याला काँहीं हैं येथे झोंपडें आहे व या ठिकाणों मनुष्यवस्ती असेल अर्से वाटत नसे.

 मनाजीरावांच्या झोपड्यांत डोकावले तर तेथे खालीलप्रमाणे व्यवस्था दृष्टीस पडे. घराच्या अंत जातांच एक बसावयाची खोली असे. तींत दोन खाटा, त्यांजवर वाघाची, हरणाचीं वगैरे कातडीं अंथरलेली असत. शेजारी एक लांकडी ठाणवई, व एका कोपऱ्यांत हुक्का दिसे. वर एक फळी टांगून तीवर वनातीत बांधलेल्या चार पांच पोथ्या ठेविलेल्या असत. भिंतीला मोठमोठया ढाली, तलवारी, बंदुका, भाले व तिरकमठे लटकत होते. एकंदर हत्यारें पाहिली तर तीं कोणा थोरा मोठ्याच्या घरची असावीत असे वाटे. त्या घरांतील रहाणी व तो इत्यारें यांत फारच विसंगतपणा दिसे. त्याच्या पलिकडच्या बाजूला कांहीं कणगी व खापराच्या उतरंडी असून खोरें, कुदळ व इतर कांहीं शेतकामाचीं इत्यारें ठेविलेली होती. त्या खोलीच्या डावेबाजूला एक खोली होती. तींत चूल, स्वयंपाकाची मडकीं, दगड्या व पाळीं पडलेलीं होतीं. मानाजीरावांच्या एकंदर संसारांत पाणी पिण्याच्या दोनचार तांब्यापितळेच्या लहाग भांड्यांशिवाय भांडे दिसत नव्हते. सर्व व्यवहार गाडग्यामडक्यांत व दगड्यापाळ्यांत होता. सर्व स्थिति अगदी कंगालशी दिसे; पण स्वतः मानाजीराव व चंपा यांस पाहिलें तर पाहाणारांस हीं कोणी थोर घरांण्यांतील असावीत असे वाटे.

 मानाजीराव आपल्या तरुणपर्णात फार देखणे असावेत. ते बांध्याने उंच असून त्यांचा मूळचा रंग चांगला गोरा असेल, पण आतां ते काळवंडलेले दिसत. नाक व डोळे तरतरीत होते. डोळे पाणीदार परंतु अतिशय घारे होते. तोंडीत एकही दांत नव्हता. नाकाचा शेंडा व हनुवटी मिळून गेलो होतो. डोकीवर जटा राखल्यासारखे केस राखले होते. दाढीही चांगली लॉव ठेविलेली होती. जटा व दाढीचें केंस अगर्दी पिकून त्यांचा पांढरा रंग जाऊन आतां त्यांना पिवळट रंग आला होता. चालतांना त्यांची कंबरही वांके. सर्व अंगास सुरकुत्या पडल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण उदासीनता दिसे. तथापि माणूस मोठा बाणेदार असावा असे पाहिल्याबरोबर लक्षांत येई.

 चंपी तर काय केवळ हिरकणीच होती. तिचा प्रत्येक अवयव अगदी रेखल्या- सारखा होता. बांधा संडपातळ, नाक उंच, डोळे रेखलेले, ओठ लाल, दाँत